बार्शीत वाळू माफियांचा कहरशहरातच वाळू उपसामहसूल विभागाकडून कारवाई

क्राईम सोलापूर

बार्शी दि जनसत्य प्रतिनिधी

सध्या बार्शीत वाळू माफियांनी हैदोस घातला असून शहरा लगतच्या ओढ्यातील वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर बार्शी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे अधिक माहिती अशी की एम एच १२  क्यू ए ७१४९ हा टेम्पो बुधवार दि १७ रोजी रात्री शहराच्या लगत असलेल्या सोलापूर रोडवरील ओढ्यातील वाळू उपसा करत असताना पकडण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तहसीलदार सुनील शेरखाने यांचेशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी या वाहनाच्या बाबतीत कारवाई करण्याची सूचना संबंधित बार्शी तलाठी यांना दिली आहे मात्र नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे हे मला आता सांगता येणार नाही असे सांगितले त्यामुळे बार्शीतील बेकायदेशीर वाळू उपसा,विक्रीआणि वाहतूक पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे  सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू उपसा आणि विक्री बंद करण्यासाठी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी  संपूर्ण जिल्ह्यात कारवाई चे धाडसत्र सुरू केले आहे यामध्ये वाळू माफियां बरोबरच वाळू प्रकरणात हस्तक्षेप आढळून आलेल्या  पोलीस कर्मचाऱ्यावर देखील कारवाई चा बडगा उगारला आहे इतकं सगळं करून ही बार्शी सारख्या मोठ्या शहरातच बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाळू विक्री सुरू आहे ही बाब बार्शीतील प्रशासनाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी अशी आहे तरी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी बार्शीतील बेकायदेशीर वाळू उपसा वाहतूक आणि विक्री याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती ठोस कारवाई करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *