मोहोळ, सीना नदीच्या पात्रात अवैध वाळू उपश्या वर कारवाई

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ,
सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळ तालुक्यातील सीना नदीच्या पात्रात अवैध वाळू उपश्या वर कारवाई करून वाळु सह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून ७ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार होत असलेल्या पोलीस कारवाई मुळे अवैध वाळू व्यवसायिक यांचे धाबे दणाणले आहेत.
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहीतीनुसार, मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील सीना नदीतुन वाळु चोरी होत आसल्याची माहिती सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्या वरून  दि. ११ मार्च रोजी दोन वाजताच्या सुमारास सीना नदीच्या पात्रातील वाळू चोरून नेताना हनुमंत दिगंबर पाटील (वय २९) रा. लांबोटी, राजू महादेव सर्वगोड वय ३३  रा. शिरापूर.  विकास वाघमारे, सोमा जगताप, अमोल पाटील मोरवंची, विष्णू पाटील लांबोटी, पप्पू पाटील, अशा ७ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन एम एच १२  ई ए ७२७७ या क्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. त्याची किंमत दोन लाख आणि इतर साहीत्य मिळून दोन लाख एक हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहेकॉ शेलार हे करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *