लग्नपत्रिकेतूनही ‘लेक वाचवा’ चा जागर;मुलीच्या लग्नाची पत्रिका मिळणार छापून

ताज्या घडामोडी सोलापूर

समीर पांडगळे यांची माहिती; 
एस.पी. प्रतिष्ठानचा उपक्रम अादर्श उपक्रम

सोलापूर : मुलगी म्हटलं की, अनेकांना तिच्या लग्नाची चिंता सतावते. आजही हुंडा द्यायची परिस्थिती नाही म्हणून कुठे मुलींच्या आत्महत्यांच्या घटना समोर येतात तर कुठे मुलीच्या पालकांच्या. मुलीच्या लग्नात येणारी अडचण अोळखून मदत म्हणून लग्नाची पत्रिका छापून देण्याचा उपक्रम सोलापूर शहरातील एस.पी. प्रतिष्ठानने घेतला अाहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर पांडगळे यांनी दिली अाहे.

लग्नात एकीकडे पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय तर दुसरीकडे ग्रामीण भागात आजही असे पालक आहेत ज्यांच्याकडे मुलीच्या लग्नाची पत्रिका छापण्यास पैसे नसतात. एसपी प्रतिष्ठानच्या वतीने ‘कन्यादान योजना’ राबवली जाते. या योजनेंतर्गत लग्नाची पत्रिका छापून देण्याचा उपक्रम राबविला जात अाहे.

ज्या मुलीचे पितृछत्र हरवले आहे अाणि जी घरात पहिलीच मुलगी  आहे, अशा मुलींची पत्रिका छापून देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. संस्थेच्या वतीने एकूण ५०० पत्रिका छापून देण्यात येईल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना एक महिना आधी संपर्क करावे लागणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा उपक्रम देखील राबवला जातो .

समीर पांडगळे सांगतात, “मुलगी ही दुसऱ्याचे धन असे म्हणून तिला घराबाहेर, समाजात दुय्यम वागणूक देण्याची मानसिकता अाहे. मुलगी फक्त लग्नाच्या खर्चापोटी नकोशी झाली. ती कळी फुलण्याअाधीच खुडण्याचे काम सुरु केले जाते. परिणामी मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली. ही समस्या लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने लेक वाचवा देश वाचवा हा उपक्रम हाती घेतला अाहे.”

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

“लेक वाचवा देश वाचवा”

लग्नाची पत्रिका म्हटलं की, देव देवता आणि महापुरुषांची प्रतिमा हे आतापर्यंतचे चित्र पाहिले आहे. मात्र, या संस्थेने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी लग्नपत्रिकेतून ‘लेक वाचवा, देश वाचवा’ चा संदेश देण्याचे ठरविले आहे. संपूर्ण लग्नपत्रिका ही रंगीत असेल. तसेच लग्नपत्रिकेवर संस्थेच्या कार्याची माहिती देखील देण्यात येणार आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

सामाजिक जाणीव म्हणून उपक्रम 

मुलगा-मुलगी हा भेदभाव पूर्वीपासून चालत अाला आहे.
मध्यमवर्गीय  कुटुंबातील मुलीच्या लग्नात अनेक अडचणी असतात. मुलींना असे वाटते की, अापल्या लग्नाची पत्रिका असावी. पण पैश्या अभावी लग्नाची पत्रिकादेखील छापू शकत नाहीत. सामाजिक जाणीव म्हणून हा उपक्रम हाती घेतला अाहे.

समीर पांडागळे
एसपी प्रतिष्ठान 
अध्यक्ष 

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *