३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ०७ वर्षे सक्त मजुरी

सोलापूर : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्या उर्फ आकाश सिध्दराम शिंदे, (वय- २१) याला न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल.जोशी यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.   याबाबत हकीकत अशी की,दि.०५ मे २०१७ रोजी दुपारच्या सुमारास यातील फिर्यादी ही घरामध्ये जेवण करत होती व त्यावेळी तिची अल्पवयीन नात पिडीता ही बाहेर खेळत होती.त्यावेळी तिच्या शेजारणीच्या मुलीने फिर्यादीला सांगितले की,आरोपी हा पिडीतेबरोबर काहीतरी करीत आहेत त्यावेळी फिर्यादी ही शेजारच्या घराकडे गेली असता त्या घराचे दार आतून बंद तेव्हा फिर्यादीने दाराच्या फटीतून पाहीले असता आरोपी हा स्वतःचे व पिडीतेचे कपडे काढून अत्याचार करत असतानाचे पाहून फिर्यादी ही जोरात ओरडली असता त्याने दार उघडले.त्यावेळी पिडीता ही घाबरलेली होती.त्यावेळी फिर्यादीने या संदर्भात पिडीतल्या विचारले असता, तिने सांगितले की आरोपी हा तिला पैशे देतो असे म्हणून गोड बोलून घेवून जावून कपडे काढले होते असे सांगितले.त्यानंतर फिर्यादीने आरोपीला पोलीस स्टेशनला घेवून आली व त्यानंतर तिने फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी विरुद्ध मा कलम ३७६ व लँगीक आपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.त्यानंतर यातील तपासिक अमलदार यांनी तपास करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ०७ साक्षीदार तपासले असून यामध्ये फिर्यादी पिडीता व तपासी अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.तसेच फिर्यादीची शेजारीण ही फितुर झालेली असतानाही मा.न्यायालयाने त्यांच्यापुढे आलेल्या पुराव्यावरुन आरोपीला दोषी धरुन शिक्षा ठोठावली.सरकारी वकिल अॅड. शैलजा क्यातम यांनी युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीला पिडीता ही लहान आहे हे माहित असतानाही त्याने अशा प्रकारचे विघातक कृत्य केलेले आहे असे मा.न्यायालयास सांगितले.न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीला भादवि कलम ३७६ सह ५११ आणि लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ चे कलम ४ सह १८ अन्वये दोषी धरुन लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ चे कलम ४ सह १८ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा १०,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.यात सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकिल अॅड. शैलजा क्यातम आणि अॅड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले, तर आरोपी तर्फे अॅड.संतोष बाराचरे यांनी काम पाहिले. तसेच सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉ. १४८२ एम.जी. कोणे यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here