सावकारांचा भडका ; आणखीन तीन सावकारांवर गुन्हे दाखल

क्राईम सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) : शहरात खासगी अवैध सावकारी जोरात सुरू आहे.अनेक गोरगरिब लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना अव्वाच्या – सव्वा व्याज दराने कर्ज देऊन मालमत्ता ताब्यात घेऊन जीवे ठार मारण्याची धमकीही दिली जात आहे.शुक्रवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी आणखीन तीन सावकारा विरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.सचिन गायकवाड रा.मेहता टॉवर, बुधवार पेठ,सोलापूर, गुड्डू तळभंडारे रा.हनुमान नगर बस डेपो जवळ,भवानी पेठ,सोलापूर, राजू कापसे रा.प्रभाकर वस्ती,सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी किशोर देविदास जाधव (वय-३४) रा.प्लॉट नंबर २५ गणेश नगर,मडकी वस्ती, सोलापूर यांनी आरोपी सचिन गायकवाड याच्याकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते व ८० हजार रुपयेच्या प्रतिदिनप्रमाणे आठशे रुपये रोखीने व्याज देणे असे ठरले होते. त्यानंतर फिर्यादीने दोन टप्प्यात ऑक्टोंबर २०१९ ते १ जानेवारी २०२० या दरम्यान दोन लाख २२ हजार रुपये व एक लाख ४२ हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण तीन लाख ६४ हजार रुपये आरोपी सचिन गायकवाड याला परत दिले.मात्र आरोपी गायकवाड याने फिर्यादी जाधव याला आणखीन ४० हजार रुपये येणे आहेत ते मला परत दे अथवा तुझी कॅन्टींग माझ्या नावावर करून दे असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली.तसेच आरोपी गुड्डू तळभंडारे याच्याकडून नोव्हेंबर २०१९ मध्ये वीस हजार रुपये घेऊन दर आठवड्याला ४ हजार रुपये व्याज घेतले होते.मात्र आरोपी तळभंडारे यास फिर्यादीने चार महिने आठवड्याला ४ हजार रुपये प्रमाणे ६४ हजार रुपये व्याज दिलेले असताना देखील आरोपीने फिर्यादी कडे आणखीन २६ हजार रुपयांची मागणी करून फिर्यादीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या कॅंटीनचे वस्तू आणण्यासाठी कुंभार वेस येथे गेले असता आरोपी तळभंडारे व राजू कापसे याने कुंभार वेस येथून फिर्यादीस जबरदस्तीने जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या शर्टाच्या गच्चीला धरून आरोपी राजू कापसे याने बुलेट वर बसून पैसे वसुली करिता फिर्यादीस घेऊन गेले.असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना दि.२० मार्च रोजी कमल हॉटेल जवळ घडली.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *