10 वी नापास भामट्याचा पोलिसाला दीड कोटीचा चुना, वकील आणि इतर पोलिसांचीही फसवणूक

ताज्या घडामोडी मुंबई

सोलापूर येथे शेत जमीन अशी मोठ्या प्रमाणात मालमत्ता

नवी मुंबई : सिडकोकडून मिळालेल्या भुंखडामध्ये फ्लॅट देतो म्हणत नवी मुंबईपो लिसांचीही फसवणूक झाल्याची घटना नवी मुंबईत पुढे आली आहे. यामध्ये आरोपी सचिन पवार याने सोसायटीच्या खात्यामधून खातेधारकाच्या खोट्या सहया करुन विजया बँकेच्या बँक मॅनेजरच्या मदतीने सोसायटीमधील भुखंडासाठी जमा केलेली दीड कोटीपेक्षा अधिक रक्कम पत्नी, मेहुणा, दाजी यांच्या खात्यामध्ये टाकले असल्याचे निषपन्न झाले आहे

सदर गुन्हा पनवेल पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांच्या आदेशानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल अजय कुमार लांडगे आणि सहपोलीस निरीक्षक काळसेकर यांच्या चैकशीनंतर खारघर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला आहे.

वकील, पोलिसांची फसवणूक

या भामटयाने फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून वकील, पोलीस कर्मचारी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांसारख्या सरकारी अधिकाऱ्यांना देखील लांखोचा गंडा घातल्याचं पुढे आलं आहे.

2010 मध्ये सचिन पवार हा एक माथाडी कामगार म्हणून एपीएमसी मार्केटमध्ये काम करत होता. त्याने मार्केटमधील इतर माथाडी कामगारांना घरासाठी कर्ज काढून देतो म्हणून कामगांराची फसवणूक केली आहे. या भामट्याने त्याच्या घरच्या लोकांनांही सोडलं नाही. त्याने दोन वेग्ळया जातीच्या महिलांबरोबर संसार थाटले आहेत.

त्याने आतापर्यंत नवी मुंबईमध्ये 3 ते 4 फ्लॅट आणि 4 ते 5 शॉप, पनवेल येथे जमीन, गाडी, सोलापूर येथे शेत जमीन अशी मोठ्या प्रमाणात मालमत्ता साठविली आहे. तसेच, सदर प्रकरणात कोणाची फसवणूक झाली आहे का? त्यांना समोर येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

भामटयाने पोलीस अधिकारी कर्मचार,वकील यांना लावला चुना

खारघर पोलीस ठाणे येथे भांदवि कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 477 अ, 409, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस उपआयुक्त पनवेल शिवराज पाटील यांच्या आदेशान्वये वरीष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल अजय कुमार लांडगे आणि सहा पोलीस निरीक्षक काळसेकर यांचे चैकशी नंतर दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *