सुशांतच्या बँक खात्यांच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून मोठा खुलासा,सुशांत हवे तसे पैसे खर्च करत होता

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : सुशांत सिंह राजपूततच्या बँक खात्यांच्या ऑडिटमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सुशांतच्या बँक अकाऊंटमधून 70 कोटींची उलढाल झाली आहे, म्हणजेच सुशांतच्या अकाऊंटमध्ये 70 कोटी रुपये आले आणि खर्च झाले आहेत.या ऑडिट रिपोर्टमुळे एक गोष्ट स्पष्ट होती की, सुशांत आपलं आयुष्य अगदी मनसोक्त आणि हवं तसं जगत होता. स्वत:वर, मित्रांवर, कुटुंब आणि घरातल्या नोकरावरसुद्धा सुशांत अगदी सहज आणि हवे तसे पैसे खर्च करत होता.

सुशांतला गाड्यांचा ही छंद होता.सुशांतने कमवलेले सत्तर कोटी मुंबईत फ्लॅट, महागड्या कार आणि बाईक यांच्यावर खर्च केले आहे. तर वेगवेगळ्या बँकांमध्ये सुशांतने पाच ते सात कोटी रुपयांची एफडी केली असून, म्युचल फंडमध्ये सुद्धा लावले आहे. पाच कोटींन पेक्षा अधिकचा कर सुद्धा सुशांतने भरला आहे. सुशांतने कोट्यावधी रुपये आपले मॅनेजमेंट स्टाफ, फिरण्यावर तसेच घर खर्चासाठी खर्च केले आहेत.सुशांतचा मुंबईत स्वतःचा फ्लॅट होता. मात्र तरीसुद्धा तो भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच भाडं लाखांमध्ये होतं आणि अशा प्रकारे सुशांतने तीन ते चार कोटी फ्लॅटच्या भाड्यात खर्च केले आहेत.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत बँक खात्यांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट केला होता. ज्यामध्ये ‘Grant Thornton’ नावाच्या कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आलं की, सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झालेलं नाही.

ईडी आता याची माहिती घेत आहे की, सुशांत सिंह राजपूतने रिया चक्रवर्ती किंवा तीच्या कुटुंबीयांवर किती पैसे खर्च केले आहेत. ईडीला संशयआहे की, एक मोठी रक्कम सुशांतने रिया आणि तीच्या कुटुंबीयांवर खर्च केली आहे. जवळपास 50 लाख रुपये सुशांतच्या अकाऊंट मधून रिया आणि तिचा भाऊ शोविक वर खर्च झाले आहेत. हा खर्च युरोप टूर,शॉपिंग, स्पा, हॉटेल आणि तिकीट बुकिंगवर खर्च झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *