नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची (CWC Meeting) बैठक सुरू आहे. पण, या बैठकीला आता वादळी स्वरुप प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.
राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विरोधीपक्षासोबत लढत असताना काही काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना यांना पत्र का लिहिले. काही नेते हे भाजपला मदत करत असल्याचा आरोपच राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत पक्षाला इशारा दिला.
‘भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा सिद्ध झाला तर पदाचा राजीनामा देईल’ असं गुलाम नबी आझाद यांनी या बैठकीत ठणकावून सांगितलं. त्यांच्या विधानामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पाहण्यास मिळत आहे. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून चांगलेच वादंग सुरू झाले आहे. सोनिया गांधी यांची जर इच्छा नसेल तर राहुल गांधी यांनी समोर यावं अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे काही काँग्रेसचे नेते हे सोनिया गांधींनीच अध्यक्ष राहावे, असं बोलून दाखवलं आहे.