सुशांतला हॉटेलमध्ये दिसलं होतं भूत, रियाने केला धक्कादायक खुलासा!

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सुशांतला हाॅटेलमध्ये भूत दिसलं होतं आणि त्यानंतरच सुशांत नैराश्यात गेला हा धक्कादायक खुलासा सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीने केला आहे.  मुंबई पोलिसांना रियाने दिलेल्या जबाबातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.  2019मध्ये युरोप दौऱ्यावर गेले असतांना ही घटना घडल्याचंही तिने सांगितले. रिया म्हणाली, ॲाक्टोंबर 2019 मध्ये मी सुशांत आणि माझा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोप टूरला गेलो होतो.

यावेळेस  आम्ही इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील एका 600 वर्षे जुन्या हाॅटेल मध्ये थांबलो होतो. या हाॅटेल मध्ये मी आणि शोविक वेगळ्या रुम मध्ये राहिलो होतो तर सुशांत दुसऱ्या रुम मध्ये राहिला होता. काही कामा निमित्त मी आणि शौविक हाॅटेल मधून बाहेर गेलो होतो.

काही तासांनी आम्ही दोघे हाॅटेलमध्ये परत आलो तेव्हा सुशांत हाॅटेलच्या एका कोप-यात बसून रुद्राक्ष माळेचा जप करत होतो. यावेळेस सुशांत खुप घाबरला होता आणि तो कापत होता ज्यामुळे त्याला घाम आला होता.  हे पाहून मी आणि शौविक ने सुशांतला हाॅटेलमधल्या रुममध्ये नेले आणि त्याची अशी अवस्था का झाली याबाबत त्याला विचारणा केली. तेव्हा सुशांतने एक धक्कादायक घटना सांगितली.

ज्या हाॅटेल मध्ये हे आम्ही तिघे थांबलो होतो त्या हाॅटेल मध्ये गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराची पेंटीग होती.  ज्यात एक राक्षस एका मुलाला खातानाचे चित्र रेखाटले होते. ती पेंटींग पाहून सुशांत खुप घाबरला होता आणि त्याला त्या पेंटींग मधलं भूत दिसत होतं.  तो त्याला बोलावत होता असं सुशांतने आम्हाला सांगितलं. या दरम्यान तो प्रचंड घाबरला होता.

मी आणि शोविकने सुशांतला कसं बसं सांभाळलं त्यानतंर आम्ही लगेच ते हाॅटेल सोडले आणि नंतर पुढे आम्ही तिघे ॲास्ट्रियाला गेलो. तिथे आम्ही बाॅडी डिटाॅक्सिफिकेशन करता 4 दिवसांचे बुकिंग केले होते. मात्र आपल्याला भिती वाटतेये आपण परत मुंबईला जाऊ असं वारंवार सुशांत मला सांगत होता. तो खुप घाबरलेला होता. आम्ही काहीच सुचत नव्हते.

सुशांतची तब्येत बिघडू लागली होती त्यामुळे आमची युरोप टूर 2 नोव्हेंबर 2019 रोजी संपणार होती ती मध्येच सोडून आम्ही 28 ॲाक्टोबरलाच मुंबईला परत आलो. सुशांत घरी गेल्यावरही सतत बेडरूम मध्येच असायचा. अधून मधून सुशांतच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज यायचे.  हे काही दिवस असंच सुरु राहिलं. म्हणून आम्ही मानसोपचार तज्ञांकडे गेलो पण सुशांतला बरं वाटतं नसल्याने आम्ही मानसोपचार तज्ञ बदलत राहिलो.

मे महिन्याच्या अखेरीस या भूतांच्या घटनेवरून सुशांत खुपच चिडचिड करु लागला होता तो सतत माझ्याशी भांडायचा. 8 जूनच्या रात्री याच विषयावरुन आमचे कडाक्याचे भांडण झाले.  शेवटी मी सुशांतच्या घरून जावं असं सुशांतने मला सांगितले. हे सांगताना देखील सुशांतला माझी किती काळजी करतो, माझ्यावर किती प्रेम करायचा हे मला दिसलं. तो मला बोलला माझ्या डिप्रेशनमुळे तूझं आयुष्य खराब होतंय तुलाही याचा त्रास होतोय त्यामुळे तू माझ्या पासून दूर रहा.

पण याच मुद्दायावरुन मग आमचे आणखी कडाक्याचे भांडण झाले आणि मी माझी बॅग घेवून सुशांतच्या घरातून निघुन गेली. या सगळ्यामुळे मला ही खुप नैराश्य आले होते म्हणून मी देखील एका मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला.  8 जून ते 14 जून दरम्यान मी आणि सुशांत अजिबात संपर्कात नव्हतो. पण या दरम्यान 10 जूनला सुशांतने शोविकला एक मॅसेज करुन माझ्या तब्येती बद्दल विचारणा केली. आणि 14 जूनला जी दुःखद बातमी आली ते ऐकून माझ्या पायाखालची जमिनच सरकली. माझं सर्वस्व गेलं होतं.

हा जबाब नोंदवत असताना रियाला रडू कोसळलं होतं. सुशांत नैराश्यात आहे हे त्याच्या कुटूंबियां देखील कळाले होते यामुळे 29 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी सुशांतच्या तब्येती विषयी सुशांतच्या वडीलांनी रियला मॅसेज करुन सुशांतच्या तब्येतीबाबत मला ही माहिती दे मी त्याचा जन्मदाता आहे मलाही त्याच्या बाबत सर्व जाणून घेण्याचा अधिकार आहे असा मेसेज केल्याचंही उघड झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *