मोहोळ ८ कोटी ६० लाख प्रलंबीत निधी मिळावा ;शाहीन शेख

ताज्या घडामोडी सोलापूर

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली मागणी

मोहोळ


मोहोळ शहरासाठी पंतप्रधान आवास योजनेतून ६१२ घरकुले मंजूर असून राज्यशासनाचा ६ कोटी १२ लाख रुपये निधी मिळाला आहे. परंतू केंद्रशासनाचा फक्त ५८ लाख निधी मिळाला आहे. ऊर्वरीत ८ कोटी ६० लाख प्रलंबीत आहे, तो निधी तात्काळ मिळावा, तसेच नागरपरिषदेला कमी असलेले कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नगराध्यक्ष शाहीन शेख यांनी नगर विकास मंत्री यांना केली.  

दि. १६ रोजी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व नगरविकास खात्याचे प्रधान सचीव पाठक यांच्या प्रमुख उपस्थीतीत नियोजन भवन येथे सोलापूर जिल्हा नगरपालिकांच्या कामकाजाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी उपस्थीत होते. 
यावेळी मोहोळ च्या नगराध्यक्ष शाहीन शेख यांनी

मोहोळ शहरासाठी पंतप्रधान आवास योजनेतून ६१२ घरकुले मंजूर असून राज्यशासनाचा ६ कोटी १२ लाख रुपये निधी मिळाला आहे. परंतू केंद्रशासनाचा फक्त ५८ लाख निधी मिळाला आहे. ऊर्वरीत ८ कोटी ६० लाख प्रलंबीत आहे, तो निधी मिळावा, अशी मागणी नगर विकास मंत्री यांना केली.  यासह मोहोळ नगरपरिषद नवीन असून आकृतीबंधाप्रमाणे ४३ कर्मचार्यांची आवश्यकता आहे. पण फक्त १८ कर्मचारी आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यांच्या कामाचा खोळंबा होतो, म्हणून आकृतीबंधा प्रमाणे कर्मचारी मिळावेत, यासह मोहोळ शहर हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसले असून या  शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत तसेच रेल्वेनेही ते जोडले गेले आहे, अश्या विकासाभिमुख शहराचा डीपी प्लान मार्गी लावून शहराच्या विकासाला चालना द्यावी, असे आवाहन शाहीन शेख यांनी केले. 
यावेळी नगरविकास खात्याचे अधिकारी पंकज जावळे, मोहोळचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके आदि उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *