बायको जोमात नवरा कोमात! 10 लाखांत नवऱ्याचा केला सौदा

ताज्या घडामोडी देशविदेश

जबलपूर  :  कधी कधी सिनेमात अशा घटना दाखवतात, त्यावेळी त्या अकल्पित वाटतात. पण प्रत्यक्षात अशा पद्धतीचे गुन्हे घडतात तेव्हा त्यावर कसं व्यक्त व्हावं हेच समजत नाही. पैशांची अत्यंत निकड असलेल्या एका स्त्रीने 10 लाखांच्या हव्यासापोटी चक्क आपल्या पतीचा सौदा केला. 2 वर्षांच्या मुलीच्या या बापाने अखेर समुपदेशन केंद्रात धाव घेत आपला सौदा थांबवायचा विनवणी केली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर याठिकाणी अजब लग्नाचा एक गजब प्रकार घडला आहे.

जबलपूरच्या (Jabalpur) एका महिलेने चक्क आपल्या पतीला विक्रीसाठी (Sold husband) काढलं आहे. दहा लाख रुपयांच्या हव्यासापोटी हा प्रकार घडला असून नवऱ्याने ही विक्री थांबावी म्हणून समुपदेशन केंद्रात धाव घेतली आहे. या अजब प्रकारामुळे समुपदेशन केंद्र देखील चक्रावले आहे.  कौटुंबिक समुपदेशन केंद्राला मिळालेल्या अर्जानुसार, जबलपूर येथील एका महिलेने चक्क आपल्या नवऱ्याचं लग्न एका दुसऱ्या मुलीशी ठरवलं. त्यासाठी एक लाख रुपये अॅडव्हान्सदेखील घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नवऱ्याने दुसऱ्या महिलेशी लग्न करावं म्हणून तिने तगादा लावला होता. त्यासाठीचे व्यवहारही तिने पक्के केले होते.

अशी माहिती मिळाली आहे की, हा बापुडवाणा नवरा जबलपूर येथील एका खाजगी शाळेत स्वयंपाकाचं काम करतो. या शाळेच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीला तो प्रचंड आवडायचा आणि तो मिळावा यासाठी आपण काहीही करू शकतो, असं ही श्रीमंताघरची मुलगी म्हणायची. ही गोष्ट या नवऱ्याच्या बायकोला कळली.

पत्नीने स्वतःच रचना नवऱ्याच्या लग्नाचा बेत

कौटुंबिक समुपदेशन केंद्राला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यापासून पतीच्या मोबाईलवर अनोळखी नावाने सतत संदेश येत होते. त्यामुळे पत्नीने तो नंबर घेऊन संबंधित मुलीशी संपर्क साधला. ती महिला त्या मुलीला अनेक वेळा भेटली. या भेटीत तिने आपल्या पतीचा सौदा केला. त्यासाठी दहा लाख रुपये देण्याचंही ठरले. आपल्या पतीने त्या मुलीशी लग्न करावं म्हणून तिने तगादा लावला. हे लग्न झाल्यानंतर तिला नवऱ्याला सोडून द्यावं लागेल, याचा अंदाज असतानाही तिने हा सौदा केला होता. यासाठी तिने एक लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले आहेत.

तरुणीने त्या पुरुषाला कसं ओढलं जाळ्यात

ही घटना एखाद्या चित्रपटातील सिनेमापेक्षा कमी नाही. अनिल कपूरचा जुदाई सिनेमा आठवेल, अशी ही प्रत्यक्षातली गोष्ट. खरं तर ज्या शाळेत हा तरुण जेवण बनवायचा, तिथेही ही मुलगी जेवायला यायची. दर दिवशी ही तरुणी त्याच्याकडून आपल्या आवडीचे पदार्थ बनवून घ्यायची. त्याचा स्वयंपाक तिला खूप आवडायचं. त्यामुळे तिने त्याच्याशी मैत्री केली. मग त्याच्या बायकोशी संधान बांधून त्याला थेट आपल्या जाळ्यात ओढलं. या दोन स्त्रियांनी आपापसात सौदा पक्का केला आणि नवऱ्याला विकलं आणि विकत घेतलं. विशेष म्हणजे या माणसाला दोन वर्षांची मुलगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *