सॅनिटाइझ करून-धुवून उन्हामध्ये वाळवल्यामुळे 2000 च्या 17 कोटी नोटा झाल्या खराब

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोना काळात  (COVID-19) अनेक गोष्टींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यवसाय, परिवहन, रोजगार या सर्वांनाच कोरोनाचा फटका बसला आहे. दरम्यान कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे लोकं नोटा देखील सॅनिटाइझ करत आहेत. लोकांनी चलनातील नोटा सॅनिटाइझ केल्यामुळे, धुवून वाळवल्यामुळे मोठ्या संख्येने चलन खराब झाले आहे. यामुळेच आरबीआयकडे पोहोचणाऱ्या खराब नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सर्वाधिक 2 हजाराच्या नोटा खराब झाल्या आहेत. आरबीआयकडे यावेळी 2 हजाराच्या 17 कोटीपेक्षा जास्त नोटा आल्या आहेत. याशिवाय 200, 500, 20 आणि 10 च्या नोटा देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत.

आरबीआयच्या अहवालानुसार यावर्षी 2 हजाराच्या 17 कोटींपेक्षा अधिक नोटा खराब झाल्या आहेत. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा 300 पट अधिक आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांनी नोटा सॅनिटाइझ करण्यास, त्या धुवून वाळवण्यास सुरुवात केली. काही बँकांमध्ये देखील नोटांच्या बंडलावर सॅनिटायझर स्प्रे केला जात आहे. यामुळे जुन्या नोटांबरोबरच यावर्षीच्या नव्या नोटा देखील खराब होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *