सोलापूर (प्रतिनिधी) नवी पेठेतील मोबाईल गल्लीतील सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरटय़ाकडून झाला.बुधवारी मध्यरात्री हि घटना घडली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महमद जाफर अब्दुल गफार शेख यांनी फिर्याद दिली आहे.बुधवारी रात्री मोबाईल गल्ली येथील संजय मोबाईल शॉपी,नितीन मोबाईल शॉपी, एस एस मोबाईल शॉपी,अपेक्स मोबाईल शॉपी, गिरीराज मोबाईल शॉपी व दयाल मोबाईल शॉपी चे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झाला.पण या दुकानांचे शटर उचकटले नाही. तसेच चोरट्या कडून कुलूप तोडण्याचा अयशस्वी ठरला.यानंतर चोरट्याने संजय मोबाईल शॉपीचे काच फोडले.तसेच इतर दुकानांचे बोर्ड तोडले,काहीचे दरवाजे फोडून आर्थिक नुकसान केले.दरम्यान,दुकानाला असलेला सीसीटीव्ही कॅमेरा ही तोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.या घटनेनंतर नवीपेठेतील रात्रीची पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी व्यापार्यांनी केली आहे.गेल्या दिवाळीच्या काळातच नवीपेठेतील काही दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड व माल लंपास केला होता.याप्रकरणी चोरांना अटक करण्यात आली आहे.तसेच काही मोबाईल दुकाने फोडून मोबाईलची चोरी केली होती.या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.त्यातच पुन्हा मोबाईल दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याने व्यापारी भयभीत झाले आहेत.
