जेलमध्येच राहणार रिया चक्रवर्ती, कोर्टाने फेटाळली 6 आरोपींची जामीन याचिका

ताज्या घडामोडी मनोरंजन

मुंबई, : सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला जेलमध्ये राहावं लागणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने सर्व 6 आरोपींची जामीन याचिका फेटाळली असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युएल मिरांडा, दीपेश सावंत, झैद विलांत्रा आणि बासित परिहार अशी सर्व 6 आरोपींची नावं आहेत.

याआधीही रियाने जामीनासाठी अर्ज केला होता पम कोर्टाने तिला नाकारलं. आज रियाचा तुरूंगात तिसरा दिवस असणार आहे. रियाने दोन दिवस तुरुंगात काढले आहेत. ज्या दिवशी कोर्टाने निकाल दिला, त्या दिवशी रियाने तिची रात्र एनसीबी लॉकअपमध्ये घालवली. यानंतर, दुसर्‍याच दिवशी रियाला भायखळा तुरुंगात हलवण्यात आलं.दरम्यान, एनसीबीच्या चौकशीदरम्यान तिला तिच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य करण्याचा जबाब देण्यास भाग पाडले गेले. एनसीबीने 3 दिवस रियाची चौकशी केल्यानंतर मंगळवारी तिला अटक करण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिची जामिन याचिका आधीच फेटाळली आहे.रिया चक्रवर्तीच्या वतीने तिचे वकील सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी जी जामिन याचिका दाखल केली होती, त्यात असं म्हटले होतं की, अटकेच्या दरम्यान (एनसीबीच्या) याचिकाकर्तीला (रिया) कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. अभिनेत्री असे सर्व कबुलीजबाब औपचारिकरित्या मागे घेते आहे. याचिकामध्ये रियाने असेही म्हटले आहे की तिची अटक ‘अनावश्यक आणि विनाकारण केली गेली’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *