प्रेम करणे गुन्हा असेल तर रिया अटक व्हायला तयार

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. आज रियाची या प्रकरणी एनसीबी चौकशी करत आहे. दुसरीकडे रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी रिया अटकेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर रिया त्याचे परिणाम भोगायला तयार आहे. रिया निर्दोष आहे म्हणून तिने सीबीआय, ईडी, एनसीबी, बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या केस मध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाकडे धाव घेतली नाही, असं सतिश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे.

NCB कार्यालयात रियाची चौकशी सुरु
माहितीनुसार सध्या एनसीबीच्या कार्यालयात रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. NCBचे तीन अधिकारी तिची चौकशी करत आहेत. यामुळं एनसीबीचं संपूर्ण कार्यालय बंद केलं आहे. परिसरात तगडी बॅरिकेडिंग केली आहे. तसंच एनसीबी ऑफिसकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *