मुंबई: सीबीआयनं काल, शुक्रवारी रिया चक्रवर्तीची तब्बल दहा तास चौकशी केली. तब्बल दहा तासाच्या चौकशीनंतर अखेर रिया आणि तिचा भाऊ शौविक घरी परतले. मात्र, घरी परतताना हे दोघे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे काही तक्रार करून अखेर ते दोघे घरी गेले.
आज देखील रियाला चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. चौकशीची वेळ अजून निश्चित झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रियाकडून मिळालेल्या उत्तरांनी समाधानी नाही.
8 ते 13 जून दरम्यान काय घडलं याची मला माहिती नाही- रिया
सीबीआयच्या कालच्या चौकशीत रियानं तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. रियानं म्हटलं की, 8 ते 13 जून दरम्यान काय घडलं याची मला माहिती नाही. सुशांत सिंह राजपूत डिप्रेशन मध्ये होता. याबाबत डॉक्टर्स माहिती देतील असं तिनं सांगितलं.
डीआरडीओ गेस्ट हाऊसमधून सांताक्रूझ पोलिस ठाण्यात पोहोचली रिया
सीबीआय चौकशीनंतर रिया आपल्या घरी न जाता सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गेली. डीआरडीओ गेस्ट हाऊसमधून घरी जात असताना रियानं आपली गाडी पोलिस स्टेशनकडे वळवली. तिथं रियाने पोलिस सुरक्षेची मागणी केली. नंतर ती पोलिस सुरक्षेत आपल्या घरी पोहोचली.