रेश्मा पडेकनूर खून प्रकरणी तौफीक शेख यास जामिन मंजूर

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

 सोलापूर (प्रतिनिधी) : रेश्मा पडेकनूर खून प्रकरणात अटकेत असलेले एमआयएम पक्षाचे नगरसेवक तौफीक शेख यांना बंगळुरू हायकोर्टाने जामिन मंजूर केल्याची माहिती त्यांचे बंधू आरिफ शेख यांनी दिली आहे.१७ मे २०१९ रोजी विजयपूरजवळील कोलार भागात रेश्मा यांचा मृतदेह आढळला होता.याप्रकरणात नगरसेवक तौफीक शेखवर गुन्हा दाखल झाला होता.पैशाच्या वादातून हा प्रकार झाला होता.याप्रकरणात कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती.तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता.दरम्यान, शुक्रवारी त्यांना बंगळुरू हाय कोर्टाने जामिन मंजूर केल्याची माहिती त्यांचे बंधू आरिफ शेख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *