प्रयत्न करुनही नवरा शरीरसंबंध ठेवत नव्हता, त्यानंतर पत्नीने उचललं ‘हे’ पाऊल

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

महिलेने नवरा आणि सासू-सासऱ्यांवर विश्वासघाताचा आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नवरा नपुसंक असल्याचे आपल्यापासून लपवून ठेवले, असा आरोप या महिलेने केला आहे. तक्रारदार नोंदवणारी महिला गुजरातच्या अहमदाबादमधील साईजपूर-बोघा भागामध्ये राहते. तिने नवरा नपुसंक असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सासरकडच्या मंडळींनी आपल्याला मारहाण केली असे या महिलेने म्हटले आहे.आरोपी बरोबर नोव्हेंबर २०१८ मध्ये माझे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा आपल्याला टाळत होता. त्याने माझ्या बरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले नाहीत, असे महिलेने तिच्या FIR मध्ये म्हटले आहे. तक्रारदार महिला बँकेत नोकरी करते. लग्नानंतर पहिले पाच दिवस नवरा स्वतंत्र झोपायचा. त्यावर तिने आक्षेप घेतला नाही. त्यांच्यावर कुठलातरी ताण असेल असा विचार तिने केला.ते हनिमूनसाठी थायलंडला गेले. तिथे सुद्धा नवरा शक्य तितका तिला टाळत होता. तिने त्याच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न केले. त्याला औषधे सुद्धा दिली. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही, असे महिलेने तिच्या FIR मध्ये म्हटले आहे. हनिमूनवरुन परतल्यानंतर तिने सासूकडे हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी सासूने तिलाच नवऱ्याच्या नपुंसकतेसाठी जबाबदार ठरवले. लहानपणी एका अपघात घडला. त्यामुळे मला मला नपुंसकत्व आले, असे नवऱ्याने आपल्याला सांगितल्याचे महिलेने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात महिलेने, जेव्हा सासू-सासऱ्यांना नवऱ्याचे नपुंसकत्व लपवून ठेवल्याबद्दल जाब विचारला तेव्हा त्यांनी मारहाण केली व तिला तिच्या आई-वडिलांकडे पाठवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *