RBI ची घोषणा; दोन दिवसांत बदलणार बँकेसंबंधी हा महत्त्वाचा नियम

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : आजपासून केवळ दोन दिवसांत बँक अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करण्याचा नियम बदलणार आहे. डिसेंबर महिन्यापासून रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात RTGS सुविधा दररोज, कोणत्याही वेळी 24 तास उपलब्ध असणार आहे. RTGS द्वारे ग्राहकांना कधीही, कोणत्याही दिवशी पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. सध्या ही सुविधा महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सोडून सर्व दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकने ऑक्टोबर महिन्यात RTGS ची सुविधा 24 तास उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयासह आरबीआयने असंही नमूद केलं होतं की, ही सुविधा सुरू झाल्यानंतर भारत त्या निवडक देशांच्या क्रमवारीत सामिल होईल, जो 24x7x365 लार्ज वॅल्ह्यू रियल टाईम पेमेंट सिस्टमची सुविधा देतो.

एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करण्यासाठीचा RTGS हा सर्वात फास्ट मोड आहे. परंतु एकाच बँकेत, एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये RTGS द्वारे फंड ट्रान्सफर केला जाऊ शकत नाही. यात फंड ट्रान्सफरची कमीत कमी मर्यादा दोन लाख रुपये आहे. RTGS मोठी रक्कम ट्रान्सफर करणारा मोड आहे. यात कोणत्याही प्रकारचा फंड ट्रान्सफर शुल्क नाही. परंतु ब्राँचमध्ये RTGS द्वारे फंड ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क द्वावं लागेल.

NEFT –

NEFT चा नियम यापूर्वीच बदलला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर संबंधी नियमांत बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर आता बँकिंग ट्रान्सफरअंतर्गत एनईएफटी 24x7x365 उपलब्ध आहे. NEFT द्वारे फंड ट्रान्सफरसाठी कोणतीही कमीत-कमी मर्यादा नाही. तर मॅक्सिमम लिमिट वेग-वेगळ्या बँकेत वेग-वेगळी असते.

RTGS आणि NEFT –

या दोन्ही मोडमध्ये पेमेंट करताना रक्कम किती पाठवायची, लाभार्थी ग्राहकाचं खातं क्रमांक, लाभार्थी बँक आणि शाखेचं नाव, लाभार्थी अर्थात ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचं नाव आणि लाभार्थी बँक शाखेचा IFSC कोड आवश्यक असतो.

NEFT/ RTGS/ IMPS च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करताना, बँक खात्यातून पैसे डेबिट झाले, परंतु लाभार्थ्याच्या खात्यात पैसे आलेच नाहीत, तर पैसे परत मिळतात का? असा अनेकांना प्रश्न पडतो. पण असे पैसे परत मिळतात. एखाद्या कारणास्तव लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये या तीनही माध्यमांतून पैसे ट्रान्सफर न झाल्यास, बँक एका तासाच्या आत ट्रान्सफर केलेली रक्कम परत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *