नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) रिटेल पेमेंट्ससाठी एका नवीन अंब्रेला एंटिटी (NUE)चे अंतिम प्रारुप जारी केले आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये केंद्रीय बँकेने या प्रारुपाचा ड्राफ्ट तयार केला होता. यातील दिशानिर्देशकांनुसार पेमेंट स्पेसमध्ये कमीत कमी 3 वर्ष काम केले असणारी, 300 कोटी रुपये मुल्य (Net Worrth)असणारी कोणतीही खाजगी कंपनी विविध पेमेंट सेवांसाठी अंब्रेला एंटिटीसाठी अर्ज करू शकतात. जाणून घेऊया ग्राहकांना या व्यवस्थेचा काय फायदा होईल.
ग्राहकांना उत्तम सुविधा आणि ऑफर्स मिळतील
सध्या केवळ नॅशनल पेमेंट्स काऊंसिल ऑफ इंडिया (NPCI) वेगवेगळ्या पेमेंट सिस्टिमना एकाच वेळी पाठिंबा देत आहे. यामध्ये RuPay, UPI
आरबीआयच्या खाजगी कंपन्यांना देखील रिटेल पेमेंट्समध्ये संधी देण्याच्या निर्णयामुळे एनपीसीआयसारखे दुसरे नेटवर्क्स तयार होतील. यामुळे ग्राहकांना रिटेल पेमेंट्ससाठी एनपीसीआय व्यतिरिक्त दुसरे देखील पर्याय उपलब्ध होतील. त्याप्रमाणे रिटेल पेमेंट्स सेक्टरमध्ये प्रतिस्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना उत्तम सुविधा आणि ऑफर्स मिळतील.
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढेल
आरबीआयच्या या निर्णयानंतर डिजिटल रिटेल पेमेंट सुविधेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. फिनटेक कन्व्हर्जन्स काऊंसिलचे चेअरमन नवीन सूर्या यांच्या मते नवीन रिटेल पेमेंट्स अंब्रेला एंटिटी सुरू झाल्यानंतर भारतामध्ये डिजिटल पेमेंट्स चा वापर करणाऱ्यांची संख्या 60 कोटींपर्यंत पोहोचेल. त्याचप्रमाणे अशी अपेक्षा आहे की 55 टक्के पेमेंट्स डिजिटल होतील. यामुळे भारत डिजिटल पेमेंट्सच्या बाबतीत विकसीत देशांच्या यादीमध्ये जाऊन बसेल. PayNearby चे एमडी आणि सीईओ आनंद कुमार बजाज यांच्या मते सध्या या क्षेत्रात केवळ एनपीसीआय असल्यामुळे दुसऱ्या कंपन्यांकडे खूप संधी आहे.
कोरोना संकटकाळात रिटेल पेमेंट्स वाढले
एनपीसीआयचे मुख्य उद्दिष्ट भारतातील लोकांनी कमीत कमी रोख रक्कम वापरणे हे आहे. कोव्हिड-19 पँडेमिक काळात डिजिटल पेमेंट सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे रिटेल पेमेंटमध्ये नवीन कंपन्यांसाठी विविध संधीचे दरवाजे उघडले आहेत. आता आरबीआयकडून रिटेल सेगमेंटमध्ये खाजगी कंपन्या नवीन अंब्रेला एंटिटीसाठी अर्ज करू शकतात या निर्णयाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर ग्राहकांना युपीआय सारख्या नव्या सेवा पाहायला मिळतील आणि त्यांचा फायदा घेता येईल.