सुपर डान्सर चॅप्टर ४मध्ये शिल्पा शेट्टीच्या ऐवजी दिसणार रवीना टंडन?

0
63

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही चर्चेत आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला अटक अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत. पतीच्या अटकेनंतर शिल्पा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शो मध्येही दिसत नाही. शिल्पाच्या ऐवजी अभिनेत्री करिश्मा कपूर परीक्षक म्हणून दिसत आहे. आगामी भागामध्ये पाहुणे म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुजा दिसणार आहे. पण शिल्पाला शोमधून कायमचे रिप्लेस करण्यात आले का? असे प्रश्न चाहत्यांना पडला आहे.ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी शोसाठी अभिनेत्री रवीना टंडनला विचारले. पण रवीनाने नकार दिल्याचे समोर आले. रवीनाला नकार देण्याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी रवीना म्हणाली, ‘हा शो शिल्पाचाच असेल आणि तिलाही शोमध्ये काम करायला आवडेल.’ रवीना सध्या परदेशात आहे. ती ऑगस्ट महिन्यात भारतात परत येणार आहे.संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिल्पा शेट्टी ही शोचा एक महत्वाचा भाग होती आणि लवकरच ती शोमध्ये पुन्हा येईल अशी आशा करुया. तो पर्यंत गीता कपूर आणि अनुराग बासू हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार दिसणार आहेत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here