रावणाने पाच हजार वर्षांपूर्वी उडवलं होतं सर्वात पहिलं विमान, श्रीलंकेचा दावा

देशविदेश

श्रीलंका : श्रीलंकेच्य नागरी उड्डयन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दानतुंज यांनी सांगितलं आहे की, रावण अलौकिक बुद्धिमत्ता असलेला राजा होता. विमानाचं उड्डाण करणारी ती पहिली व्यक्ती होती. ही पौराणिक कथा नसून तथ्य आहे. यावर सविस्तर संशोधन होण्याची गरज आहे. पुढील पाच वर्षात आम्ही हे सिद्ध करु.रावणाने पाच हजार वर्षांपूर्वी सर्वात प्रथम विमानाचा वापर केला होता असा दावा श्रीलंका सरकारकडून करण्यात आला आहे. यादरम्यान श्रीलंका सरकारने रावणासंबंधी जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी लोकांना त्यांच्याकडे कागदपत्रं किंवा पुस्तकाच्या माध्यमातून असणारी कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करण्यास सांगितलं आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, जाहिरात पर्यटन तसंच नागरी उड्डाण मंत्रालयाकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यातून लोकांना पुढे येऊन रावणांसंबंधी त्यांच्याकडे असणारी उपलब्ध माहिती देण्यास सांगितलं आहे.
श्रीलंकेसाठी रावण एक महान राजा होता. यामुळेच जाहिरातीच्या माध्यमातून सरकारने लोकांकडे रावणासंबंधी अधिक संशोधन तसंच आपल्या इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी मदत मागितली आहे. श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने विमान उडवण्यासाठी रावणाकडून वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी एक मोहीमच हाती घेतली आहे.
गतवर्षी नागरी विमान उड्डाण तज्ञ, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि काही इतर तज्ञांनी एका परिषदेत रावणाने पाच हजार वर्षांपूर्वी विमानाने उड्डाण करत भारतापर्यंत प्रवास केला होता आणि नंतर सुरक्षितपणे परतले होते असा दावा केला होता. श्रीलंकेत रावणासंबंधी लोकांमध्ये खूप आस्था आणि आदर आहे. 17 एप्रिल 2019 मध्ये श्रीलंकेने उपग्रहाला ङ्गरावण 1ङ्ख नाव दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *