राशी भविष्य

राशी भविष्य


12 ऑगस्ट 2020
मेष
: शुभ रंग: पिवळा, शुभ दिशा:दक्षिण
विचारपूर्वक काम करून आर्थिक स्थिती सुधरू शकता. आशाजनक वातावरण निर्माण होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा.
वृषभ : शुभ रंग:लाल, शुभ दिशा:दक्षिण
धार्मिक, शुभकार्याची आखणी कराल. आपल्या लोकप्रियतेचा फायदा होईल. आरोग्य मध्यम राहील. मेहनतीवर विश्‍वास ठेवा चांगले फळ मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल.
मिथुन:शुभ रंग:हिरवा, शुभ दिशा:पूर्व
शुभचिंतकाची भेट झाल्यामुळे आनंदी रहाल. कौटुंबिक व सामाजिक स्तरावर मान सन्मान व प्रतिष्ठा मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कर्क :शुभ रंग:केसरी, शुभ दिशा: उत्तर
रोजगारात परिवर्तन कींवा नवीन संधी चालून येईल. कार्यक्षमता वाढणार आहे. स्वत:च्या बुद्धीने कामे करा. विरोधकांपासून सावध रहा. कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहील.
सिंह : शुभ रंग:पांढरा, शुभ दिशा:पूर्व
आपल्या चातुर्याचे आपले अधिकारी कौतुक करतील. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. आर्थिक आवक वाढेल. कोणतेही काम करतांना दोनदा विचार करा.
कन्या : शुभ रंग:गुलाबी,शुभ दिशा: उत्तर
व्यवसायात अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. भ्रमात न राहता स्व:विवेक बुद्धीने काम करा. कौटुंबिक परिस्थिती तणावपूर्ण राहील.
तुळ : शुभ रंग:लाल,शुभ दिशा: पश्‍चिम
बुद्धीचे कामे अधिक करू नका. आहारात नियमितता ठेवा. व्यापार मध्यम राहील. व्यक्तिगत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदारीकडे लक्ष द्या.
वृश्‍चिक : शुभ रंग:जांभळा, शुभ दिशा:पश्‍चिम
अडकलेली कामे वेळेत पूर्ण होतील. व्यापारात फायदा होईल. मोठ्या लोकांशी संबंध वाढतील. आर्थिक चिंता सलत राहील. कौटुंबिक तणाव रहाण्याची शक्यता.
धनु: शुभ रंग:हिरवा, शुभ दिशा: उत्तर
कोणत्यातरी प्रसिद्ध व्यक्तिशी संबंध वाढतील. आरोग्य चांगले राहील व्यापारामध्ये विस्तार होईल. स्थावर मालमत्तेची विक‘ी करतांना घाई गडबड करू नका.
मकर: शुभ रंग :केसरी,शुभ दिशा:पूर्व
कौटुंबिक सहकार्य मिळाल्याने आजचा दिवस आनंदी जाईल. पराक‘म व क्षमतेमुळे आपल्याला यश व फायदा होईल. खर्च विचार करून करा. रोजगारात प्रगती राहील.
कुंभ : शुभ रंग:गुलाबी, शुभ दिशा:दक्षिण
व्यापारातील फायदा, मानसिक प्रसन्नता व उत्साह वाढविल. मुलांच्या भविष्याची काळजी राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक समाधान मिळेल.
मीन : शुभ रंग : निळा, शुभ दिशा :पश्‍चिम
चांगल्या व्यक्तींचा संप ठेवा. आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा आदर व सेवा करा. आळस सोडून द्या. समाजात आपली पत वाढेल.

12 ऑगस्टला जन्मलेल्या लोकांचा भविष्य
स्वभाव :
तुमच्या जन्मतारखेवर चंद्र व सुर्याचा दुहेरी प्रभाव आहे. समाजकारणात तुम्हाला जास्तीत जास्त रस असतो. दीनदलितांबल तुम्हाला कळवळा आहे. त्यांची दु:खे दूर करण्यासाठी काय करता येईल याचा तुम्ही विचार करीत असता. नेतृत्वाचे गुण तुमच्या अंगी जन्मजात असतात. त्यामुळे एखाद्या आंदोलनाचे नेतृत्वही सहज करता. ज्ञान मिळवण्याची तुम्हाला आवड आहे. ते ज्ञान इतरापर्यंत पोचवण्याचीही तुम्ही खटपट करता. तुमच्या जीवनाला नैतिक मूल्यांची, आध्यात्मिक विचारांची भक्कम बैठक असते.
लोकांच्या कामात मग्न असतांना आपली वैयक्तिक कामे बाजूला पडणार नाहीत याची काळजी घ्या. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत नाहीत याकडेही लक्ष्य द्या. हलका व्यायाम घ्या. फिरण्याची सवय ठेवा. नाहीतर वजन वाढून मधुमेह, उच्च रक्तदाब विकार त्रास देतील.
कार्यक्षेत्र : लोकांचे कल्याण साधू इच्छिणार्‍या सेवाभावी संस्थात काम करणे तुम्हाला आवडेल. समाजकारणात सकि‘य असल्याने नगरसेवक, आमदार, खासदार अशी वाटचाल करू शकाल. शिक्षण, न्यायदान, बँकिंग, सहकरी तत्वावरील संस्था, विक‘ीय महामंडळे, घरबांधणी संस्था येथे तुम्ही आपला ठसा उमटवाल. धर्मिक, आध्यात्मिक पुस्तकांचे लेखन, मुद्रण, प्रकाशन, पत्रकारिता यामध्येही प्रगती होईल.
प्रणयी जीवन : आपला जोडीदार आपल्यासारखाच समाजासाठी झटणारा असावा असे तुम्हाला वाटते. आंदोलन चळवळी निमित्ताने झालेल्या ओळखीतून समविचाराचा साथीदार भेटू शकतो. केवळ शरीरसुखाच्या पाठीमागे धावणारी सुखलोलुप माणसे तुम्हाला आवडत नाहीत. एप्रिल 21 ते मे 20 मधील व्यक्ती टाळा. नोव्हेंबर 23 ते डिसेंबर 20 मधील व्यक्ती निवडा.
वर्षफळ : उच्च शिक्षण, प्रशिक्षण, प्रतिनियुक्ती या निमित्ताने परदेशी वा खाजगी कंपनीतर्फे परदेशगमनाचा योग आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मोठ्या खर्चाच्या तयारीसाठी तरतूद करा. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वैवाहिक जीवनात प्रसन्नता अनुभवाल. जानेवारी फेब्रुवारी मध्ये नोकरीनिमित्त प्रवास दौरे करावे लागतील. मार्च एप्रिल मध्ये उधारी, जुनी येणी वसूल होतील. मे जून मध्ये मधुमेह टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवा.
महत्वाचे वर्ष : 3, 12, 30, 39, 48, 57, 66.
भाग्यरत्न : पुष्कराज
याच तारेखेची व्यक्ती : विक‘म साराभाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *