राशी भविष्य 18 ऑगस्ट 2020

राशी भविष्य


मेष : शुभ रंग :जांभळा, शुभ दिशा :पश्‍चिम
सामाजिक मान सन्मान मिळाल्याने आनंदी रहाल. चैन करण्याकडे ओढा राहील. व्यापारात नवीन संबंध फायदेशीर ठरतील. वहान चालवतांना काळजी घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
वृषभ : शुभ रंग:काळा, शुभ दिशा: उत्तर
प्रतिष्ठित व्यक्तींची भेट आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मानसिक संतोष निर्माण होईल. व्यवसाय चांगला चालेल. विरोधकांपासून सावध रहा.
मिथुन : शुभ रंग:पिवळा, शुभ दिशा: पश्‍चिम
प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मान सन्मान मिळेल. शांत व विवेक बुद्धीने काम केल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापार व्यवसाय चांगला चालेल.
कर्क : शुभ रंग: पांढरा, शुभ दिशा: दक्षिण
कामकाजामध्ये व व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक सहकाय कमी प्रमाणात मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानी रहाल.
सिंह : शुभ रंग:गुलाबी, शुभ दिशा:पूर्व
व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जीवनसाथी बरोबर वाद विवाद होण्याची शक्यता आहे.
कन्या : शुभ रंग:लाल, शुभ दिशा: उत्तर
आपल्या बुद्धीच्या जोरावर आखलेल्या योजना यशस्वी होतील. आपल्या कामकाजात बदल होण्याची शक्यता आहे. वाहन चालवतांना सावधानी बाळगा.
तुळ : शुभ रंग:केसरी, शुभ दिशा:उत्तर
व्यावहारीक समस्यांमुळे आपण त्रस्त व्हाल. धैर्याने आणि संयमाने कामे कराल. व्यापार, नौकरीमधील स्थिती मध्यम राहील. कौटुंबिक सहकार्य आज मिळणार नाही.
वृश्‍चिक : शुभ रंग : हिरवा, शुभ दिशा:पूर्व
न्यायालयीन कामात यश मिळेल. व्यापारात नुकसान होण्याचे योग आहेत. घरातील वृध्द व्यक्तिंच्या आरोग्याची काळजी घ्या. अडकलेला पैसा मिळेल.
धनु : शुभ रंग :निळा,शुभ दिशा:पश्‍चिम
प्रभावशाली व्यक्तित्वामुळे आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी रहाल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
मकर: शुभ रंग:लाल,शुभ दिशा: उत्तर
जीवनात नवीन संधी निर्माण होईल. तणावमुक्त होऊन कार्य करा. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याचे योग आहेत. बेफीकीरीने कामे करून नका.
कुंभ : शुभ रंग:हिरवा, शुभ दिशा:दक्षिण
आर्थिक बाबतीमधील प्रकरणे आज सुरळीत पार पडतील. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे. काही घटनांमध्ये आपल्याला आज मन:स्ताप सहन करावा लागेल.
मीन : शुभ रंग:केसरी, शुभ दिशा:उत्तर
नवीन व्यवसायास सुरूवात करू शकता. नम्रता ठेवल्यामुळे व्यवहारात हमखास यश मिळेल. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा. दांम्पत्य जीवन सुखी राहील.

18 ऑगस्टला जन्मलेल्या लोकांचा भविष्य
स्वभाव :
तुमच्या जन्मतारखेवर सूर्य, शनी व मंगळाचा प्रभाव आहे. तुमचा उत्साह पाहून इतरजणही प्रभावित होतात. कोणतेही काम तुम्ही प्रचंड आत्मविश्वासाने सुरू करता. पण काही वेळा त्याचे परिणाम नंतर लक्ष्यात आल्याने ते तुम्ही अर्धवट सोडून देता. तुमच्याकडे दूरदर्शीपणा आहे पण दरवेळी तुम्ही त्याचा वापर करीत नाही. भावनेच्या भरात कामाला हात घालता. त्यामुळे बर्‍याच वेळा पश्‍चातापाची पाळी येते. सत्ता, अधिकार या गोष्टी तुम्हाला हव्या असतात व चिकाटीच्या जोरावर त्या प्राप्तही करता. भावनाविकारांचा पगडा मनावर बसू देऊ नका. भावी परिणामांचा विचार करूनच काय तो निर्णय घ्या. संताप, त्रागा यामुळे डोकेदुखी उच्च रक्तदाब यांचा त्रास होईल. अशा भावनांचे विवेचन खेळामध्ये होऊ शकेल.
कार्यक्षेत्र : यंत्रतंत्रावरील प्रभुत्व ही तुमची जमेची बाजू आहे. तांत्रिक नैपुण्य, हस्तकौशल्य संपादन करणे तुम्हाला सहज जमते. त्यामुळे अभियांत्रिकी शाखेत इंधने, ऑटोमोबाईल, वीज, यंत्ररचना वगैरे क्षेत्रातील पदवी संपादन करून अनुभवानंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकाल. तुमच्या साहसी प्रवृत्तीला पोलिस, लष्कर, विमानदल, अग्निशमन दल, गुप्तचर खाते ही क्षेत्रेही पोषक ठरतील.
प्रणयी जीवन : सहचराच्या देखणेपणाला, शरीरसौंदर्याला तुम्ही जास्त महत्व देता. बौध्दिक काथ्याकूट करणारी माणसे तुम्हाला आवडत नाहीत. स्वत:च्या साहसी प्रवृत्तीचे कौतुक करणार्‍या व्यक्ती प्रिय होतात. जुनाट विचारसरणीच्या माणसांशी जमणार नसल्याने डिसेंबर 21 ते जानेवारी 19 मधील व्यक्ती टाळा. सप्टेंबर 23 ते ऑक्टोबर 22 मधील व्यक्ती निवडा.
वर्षफळ : नवे प्रकल्प उभे करण्यासाठी शासनाची, खाजगी भांडवदाराची मदत मिळेल. समाजात प्रतिष्ठा उंचावेल. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नव्या उत्पादनांच्या एजन्सी पदरात पडतील. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तंत्राज्ञानात वर्चस्व प्रस्थापित कराल. जानेवारी फेब्रुवारी मध्ये किडनीच्या विकारापासून काळजी घ्या. एप्रिल मे मध्ये पराक‘मावर कोणीतरी माणूस फिदा होईल. जून जुलै मध्ये कार्यालयात सत्ता अधिकार मिळू शकेल.
महत्वाचे वर्ष : 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72.
भाग्यरत्न : पोवळे
याच तारेखेची व्यक्ती : पं. विष्णु दिगंबर पलुस्कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *