रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान, परबांनी उडवली खिल्ली

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्रात पोलिसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान आहे, अशा शब्दांत अनिल परब यांनी आठवले यांचा समाचार घेतला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं काल राज्यपाल यांची भेट घेतली. एवढंच नाही तर तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावलं आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर (POK)वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं राहावं. कंगनानं आपला बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल आम्ही ऐकून घेणार नाही. कंगनाचं आपलं बस्तान उचलावं हेच योग्य ठरेल, अशा शब्दांत अनिल परब यांनी इशारा दिला आहे

रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. मात्र, नंतर त्यांनी महाराष्ट्रात थेट राष्ट्रपती राजवटी लागू करण्याची मागणी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *