सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला नवे वळण, रिया पाठोपाठ श्रुती मोदी ईडी कार्यालयात हजर!

क्राईम महाराष्ट्र

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. रिया चक्रवर्ती अखेर ईडी कार्यालयात पोहोचली आहे. त्यापाठोपाठ आता श्रृती मोदीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

तब्बल 50 हुन अधिक दिवसानंतर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला आता नवीन मिळालं आहे. सीबीआयने तक्रार दाखल केल्यानंतर ईडीनेही चौकशीला सुरुवात केली आहे. आज दुपारी रिया चक्रवर्ती नाही हो, म्हणत अखेर ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाली आहे.  या प्रकरणी ईडीला मनी लाँड्रिगचा संशय आहे. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे.

रिया ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी श्रुती मोदीलाही चौकशीसाठी बोलोवण्यात आले आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या केससह सीबीआय चौकशीमध्ये श्रुतीचे नाव आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला देखील समन्स पाठवल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहे श्रुती मोदी?

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर श्रुती मोदी हे देखील नाव आहे. यानंतर श्रुती मोदीचे सुशांतच्या मृत्यूशी काय कनेक्शन आहे, असे सवाल उपस्थित झाले होते. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, श्रुती मोदी या महिलेने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.

सुशांतच्या कंपनीमध्ये रिया-शोविकचे सर्व काम श्रुती पाहायची. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी याआधी श्रुतीची चौकशी केली आहे. आता पाटणा पोलीस देखील तिच्या पत्त्यावर जाऊन श्रुतीची चौकशी करू शकतात. यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी धागेदोरे सापडतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला ईडीने चौकशी कडक केली आहे. ईडीने या प्रकरणात मनी ट्रेलच्या तपासात गुंतली आहे. ईडीने सूत्रांकडून माहिती मिळवली आहे की गेल्या काही वर्षात रियाची नेट कमाई 10 लाख ते 12 लाख आणि नंतर 14 लाखांपर्यंत पोहोचली आहे. ईडीच्या सूत्रांनी इन्कम टॅक्स रिटर्नच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केली आहे. यामध्ये एक रिया आणि दुसरी प्रॉपर्टी तिच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. रियाने या दोन्ही प्रॉपर्टीसाठी कुठून पैसे दिले त्याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे. काहीतरी गोंधळ असल्याचे लक्षात आल्यावर ईडीने या प्रॉपर्टीचे कागदपत्र मागितले आहेत. गुरुवारपर्यंत याबाबत कागदपत्र मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *