Rajasthan: पायलट असल्याने अखेर वाचलं काँग्रेसचं सरकार, विश्वासमत जिंकलं!

ताज्या घडामोडी देशविदेश

जयपूर : सचिन पायलट यांनी बंडखोरीची तलवार म्यान केल्याने राजस्थानमधलं काँग्रेसचं अशोक गेहलोत सरकार वाचलं आहे. विधानसभेत अविश्वासाच्या प्रस्तावावर चर्चा झाली आणि त्यानंतर ध्वनिमताने प्रस्ताव मंजूर झाल्याने काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शुक्रवारी विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर भाजपने अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता. मात्र बंड शमल्याने काँग्रेस सरकारला धोका नव्हता. आता सचिन पायलट यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी दिल्लीत चर्चा केल्यानंतर सचिन पायलट यांनी आपली तलवार म्यान केली होती. विश्वासमत मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राजस्थानमधला राजकीय पेच मिटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *