तर….यांना काय कळणार राजन पाटील?

0
301
जनसत्य प्रतिनिधी
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कामकाज जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम चालु आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावा, असे सांगत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, मोहोळ नगर परिषद व भीमा शुगर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागून पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन राजन पाटील यांनी केले .
मोहोळ येथील मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद बैठक प्रसंगी माजी आमदार राजन पाटील हे होते.
आमदार यशवंत माने, पं. स सदस्य अंजिक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जि.प. सदस्य शिवाजी सोनवणे, जालिंदर लांडे, नानासाहेब डोंगरे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, यशोदाताई कांबळे, अस्लम चौधरी, ज्ञानेश्वर चव्हाण, भारत सुतकर, नागेश साठे, सभापती रत्नमाता पोतदार, रामदास चवरे, जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे, सज्जनराव पाटील, शिवाजी चव्हाण, महेश पवार, नगरसेवक अतुल गावडे, कुंदन धोत्रे, राजाभाऊ सुतार, रामराजे कदम, नगरसेवक मुश्ताक शेख इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले की,
माजी आमदार राजन पाटील व मोहोळ तालुक्यातील जनतेने काम करण्याची संधी दिल्यामुळे आतापर्यंत ४२५ कोटींची कामे मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये करू शकलो असून यापुढेही आणखी भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. यासह येत्या काही दिवसात राज्यातील विधानसभेच्या रिक्त होणाऱ्या व राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागेवर राजन पाटील यांना संधी मिळवुन देन्यासाठी प्रयत्नशिल राहु, असा आत्मविश्वास आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केला.
यावेळी युवती अध्यक्ष अविना राठोड, स्मिता कोकणे, तालुका युवक अध्यक्ष राहुल मोरे, विधानसभा अध्यक्ष शशिकांत पाटील, सचिन चवरे, विजय कोकाटे, विकास कोकाटे, दत्तात्रेय पुराणिक, संतोष खंदारे, दत्तात्रय खवळे, शुक्राचार्य हावळे, हरिश्चंद्र अवताडे, बाळासाहेब भोसले, जगन्नाथ कोल्हाळ, सुनील सातपुते, अमोल कादे, रामचंद्र शेळके, सतीश भोसले, भाऊसाहेब सलगर, हनुमंत पोटरे, राजाभाऊ गुंड पाटील, असलम चौधरी, राजकुमार पाटील, दत्तात्रय पवार, बापूसाहेब आठवले, अशोक चव्हाण, धनाजी गावडे, रावसाहेब भाकरे, राज अवताडे पाटील, राजू वाघमारे, तात्यासाहेब पाटील, राजाभाऊ सुतार, पोपट जाधव, ऋतुराज देशमुख, नागेश बिराजदार, रत्नाकर नाईकनवरे, बालाजी साठे, दयानंद राऊत, ब्रह्मदेव चव्हाण,आकाश हाके, आदिनाथ वागज, प्रवीण सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
तर….यांना काय कळणार राजन पाटील?
गेल्या तीस वर्षापासून मोहोळ तालुक्याच्या राजकारणात असून मला अजूनही राजन पाटील यांचा स्वभाव समजला नाही…तर काल परवा येणाऱ्यांना काय कळणार, असा टोला भिमाचे माजी संचालक नानासाहेब डोंगरे यांनी लगावताच सभागृहात एकच हशा पिकला… तर याला अनुसरून पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे यांनी सांगितले की, मी शिवसेनेचा तालुकाप्रमुख असतानाही कुरुल ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंच पदी माझी शिफारस राजन पाटील यांनी केली होती.. त्यामागचा हेतू आज ही काही समजत नाही… तसेच याला अनुसरून आमदार यशवंत माने ही म्हणाले की, मी तिकीट मागणी करता बारामतीला गेलो की, मला राजन पाटील यांच्याकडे पाठवायचे आणि राजन पाटील यांच्याकडे गेलो की ते मला बळीराम काका साठे आणि बारामतीकर यांच्याकडे पाठवायचे. त्यामुळे मलाही अजूनही राजन पाटील यांचा मूळ स्वभाव समजला नाही.
तालुका राष्ट्रवादीत अनाजीपंत यांना थारा नाही…
माझ्याकडे येऊन जे मोठे झाले आणि विरोधात गेले ते स्वतःहून माझ्याकडे आले होते. त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. भविष्यात मी एकटा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या जीवावर आमदार निवडून आणू शकतो. असा आत्मविश्वास आहे.
राजन पाटील ,माजी आमदार मोहोळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here