राजभवनला कोरोनाचा विळखा;24 कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग, राज्यपाल ठणठणीत (सुधारित)

मुंबई : राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी, अधिकार्यांची सं‘या आता 24 झाली आहे. आधी राजभवनमधील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
त्यानंतर 100 कर्मचार्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 40 कर्मचार्यांचे अहवाल शनिवारी सायंकाळी आले.
त्यात 14 जण पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारी दुपारी आणखी एक अहवाल आला असून, त्यात अन्य 8 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचार्यांची सं‘या आता 24 झाली आहे.