राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग,सोलापूर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुणे : जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने  ऑगष्टमध्ये माञ जोरदार बँटिग सुरू केलीय. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

पण यंदा माञ, जुलै महिन्यात वरूण राजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगष्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केलीय. एक नजर टाकुयात आकडेवारीवर गेल्या 15 दिवसात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस.

सोलापूर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस.तर नंदूरबार, अकोला, यवतमाळ, अमरावती, गोंदियात माञ सरासरी पेक्षा कमी पाऊस. पण 13 ते 17 ऑगष्टपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज.

या दुसऱ्या टप्प्यात विशेषत: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेचे संशोधक डॉ. अनुमप कश्यपी यांनी व्यक्त केलाय. कृष्णा – भीमा खोऱ्यातली धरणंही आता भरू लागलीत. कृष्णा खोऱ्यातील धरणं 75 टक्के तर भिमा खोऱ्यातील धरणं 65 टक्के भरली आहेत.

राज्यातलं सर्वात मोठं उजनी धरण मात्र अजूनही 30 टक्क्यांवर आहे. दरवर्षी साधारणपणे सोलापूर हे पर्जन्यछायेचे जिल्हे नेहमीच दुष्काळी राहतात. पण यावेळी नेमक्या याच जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला आहे. हे यंदाच्या मान्सूनचं खास वैशिष्ट्य असल्याचं म्हटलं जातं. तसंच जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऑगष्टमधील मोठ्या पुराचा धोकाही काही प्रमाणात टळला आहे. आणि वरून सध्याच्या पावसाने बहुतांश धरणंही भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *