मुंबई : गेल्या अनेक दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळाल्या. आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परताची प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून या भागातील नागरिकांना इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबरपासून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वीज व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यानुसार कामाची आखणी करावी. यंदा मुसळधार पावसाने सर्वांना झोडपूड काढले आहे. यात शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे.सातारा व सोलापूर जिल्ह्यातील तुरळक भागात ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय 10 ऑक्टोबरला नांदेळ व लातूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही वादळी वारा व ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
.याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्ह्यात अत्यंत तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात. दुसरीकडे पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.