2021 : यंदाच्या सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडणार

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

  • यंदा मान्सून सरासरीच्या 101 टक्के
  • भारतीय हवामान खात्याकडून अंदाज
  • उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के पावसाचा अंदाज

मुंबई : यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून

आयएमडीने वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्य राहणार असून पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.खरंतर, 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं. यानुसार, भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के मान्सूनचा पाऊस बरसेल. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस पडू शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज आहे.

पुढचे ४ दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

दरम्यान, पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुणे, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे ४ दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

उन्हाळ्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद

खरंतर, मार्चपासून आत्तापर्यंत उन्हाळ्याच्या काळात राज्यभरातच सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. लातूर, अहमदनगर, अकोला, नंदुरबार, हिंगोली हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. सांगली, जालना, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये या आठवड्यातील पाऊस भर घालेल.

10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात

दरम्यान, मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पावसाळ्याआधी शेतीची अनेक काम सुरू झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा वेळेवर दाखल होणार मान्सून हा शेतकऱ्यांसाठीदेखील लाभदायक असणार आहे. भारतातील सुमारे 200 दशलक्ष शेतकरी धान्य, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासारख्या अनेक पिके पेरण्यासाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *