भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वर भाजप-आरएसएसचं कंट्रोल; राहुल गांधी

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्राचा हवाला देत भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप लावले आहे. या दोन्ही संघटना भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप  कंट्रोल करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांनी ट्वीटवर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.

राहुल गांधी यांनी जी बातमी शेअर केली त्यात रोहिंग्या मुसलमानांबाबतीत भाजप नेता टी. राजा सिंह यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. रिपोर्टनुसार टी राजा सिंह यांचं वक्तव्य फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करत होते, मात्र, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचं फेसबुकवर अजूनही अकाउंट आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात, “भाजप आणि आरएसएस भारतात फेसबुक आणि व्हाट्सअपला नियंत्रित करत आहे. या संघटना या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून याचा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी करतात. पण, शेवटी अमेरिका मीडियामुळे फेसबुक संदर्भात सत्य समोर आले आहे.

सीमावादा वरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा

काँग्रेस नेते वारंवार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करत आहे. याअगोदर त्यांनी पीएम मोदी यांच्या वर हल्ला करताना म्हटले होता, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यवर विश्वास आहे.
काय आहे प्रकरण?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कारवाई केली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी फेसबुक इंडियाच्या धोरण विभाग प्रमुख अनखी दास यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.

फेसबुक प्रकरणात जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडून चौकशीची मागणी 

फेसबुक प्रकरणात जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडून चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फेसबुक इंडिया पक्षपात करत असल्या प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी तीन वेळा अमेरिकेत भेट घेत कंपनीला प्रकार लक्षात आणून दिला होता, असा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. 2019 च्या निवडणुकीत राफेलच्या मुद्द्यावर जाहिराती लावल्या जात नव्हत्या फेसबुककडून, असाही आरोप करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *