भारताची ताकद वाढली! फ्रान्समधून रवाना झाली 5 ‘राफेल’

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : भारतीय सैन्याची ताकद आता आणखीन वाढणार आहे. फ्रान्समधून भारताकडे येण्यासाठी राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी रवाना झाली आहे. यामध्ये 5 विमानांचा समावेश आहे. त्यापैकी 2 विमान ट्रेनर आणि 3 लढाऊ विमानं असल्याची माहिती मिळाली आहे. अखेर राफेल विमानाची प्रतीक्षा संपली आहे.ही 5 विमान बुधवारी (29 जुलैला) भारतात दाखल होणार आहेत. फ्रान्समधून राफेलचं उड्डाण झाल्यानं आता चीन आणि पाकिस्तानला सूचक इशाराच आहे.

सर्वात वेगवान आणि लढाऊ असणारं राफेल हे विमान फ्रान्सच्या मेरिनाक बेसवरून रात्री साडे बाराच्या सुमारास भारतात उड्डाण करणारे असून बुधवारी भारताच्या अंबाला एअरबेसवर पोहोचेल. ही पाच विमाने त्यांच्या भारत भेटीदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबीजवळील अल-डाफ्रा फ्रेंच एअरबेसवर थांबतील. तेथून ते बुधवारी अंबाला येथे पोहोचतील.

ही विमानं भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यानं भारताचं सैन्य बळ आता आणखीन वाढणार आहे. सीमेवर सातत्यानं कुरापती करणाऱ्या पाकिस्तान आणि चीनची आता धडगत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *