सुख‍विंदर कौर ते राधे मां… असा आहे राधे मां बनण्याचा प्रवास

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई : टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) काल 3 ऑक्टोबरपासून सुरु झाला. या बिग बॉसमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती राधे मां च्या नावाची. या शोमध्ये राधे मां  ‘बिग बॉस 14’ कडून पत्येक आठवड्यासाठी 75 लाख रुपयांची मागणी केली आहे. तसं तर राधे नेहमीच चर्चेत असतात.  त्यांच्याविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊयात.

राधे मांच्या आयुष्याविषयी अनेक किस्से आहेत. सुखविंदर कौर असं राधे मांचं खरं नाव. राधे मांचा जन्म  पंजाबच्या गुरदासपूरमधील दोरांगला गावात झाला. ती आता 55 वर्षांची आहे. राधे मां एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आहे. जी स्वत: ला देवीचा अवतार म्हणवते. ती आपल्या भक्तांना देवी सारख्या लाल कपड्यांमध्येच भेटते. ती फारसं बोलत नाही. तिच्या हातात एक छोटा त्रिशूलही असतो.

सुखविंदर कौरने 9  वी पर्यंतच शिक्षण घेतलं. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने मुकेरीयाच्या मनमोहन सिंगसोबत लग्न केलं होतं. तो मिठाईच्या दुकानात काम करायचा. लग्नानंतर राधे मांचे पती कतारमध्ये नोकरीला गेले होते.  कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. असं म्हटलं जातं की, लोकांचे कपडे शिवून ती आपला उदरनिर्वाह करायची.

माहितीनुसार वयाच्या 21 व्या वर्षी सुखविंदर कौर महंत श्री रामदिन दास यांच्या आश्रयाला पोहोचली. त्यांनी सुखविंदरला सहा महिन्यांसाठी दीक्षा दिली. अध्यात्माची दीक्षा घेतल्यानंतर रामदीप दास यांनी सुखविंदरला नवीन नाव दिले आणि ती राधे मां म्हणून ओळखली जाऊ लागली.

राधे मां आता मुंबईत राहते. तिच्या घरी दर आठवड्याला माता की चौकी, सत्संग आणि जागरण आयोजित केलं जातं. यात हजारो भाविक असतात. राधे मांच्या भक्तांमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आहेत. रवि किशन, मनोज बाजपेयी, डॉली बिंद्रा आणि गजेंद्र चौहान यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींसोबत राधे मांचे फोटो समोर आले आहेत.

राधे मां नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. आता जर त्या बिग बॉस मध्ये आल्या तर एक खास आकर्षण असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *