रिया म्हणाली- सुशांत सिंह तिला ड्रग्ज घ्यायला भाग पाडायचा; चौकशीनंतर ड्रग्ज घेतल्याची दिली कबुली

मनोरंजन महाराष्ट्र

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात मंगळवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने तीन दिवसांच्या चौकशीनंतर ही मोठी कारवाई केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. वारंवार नकार देऊनही सुशांत सिंह राजपूत आपल्याला ड्रग्ज घेण्यास भाग पाडायचा, असा दावा तिने केला आहे.

रिया सुरुवातीपासून एनसीबीशी सतत खोटे बोलत होती. मात्र सोमवारी तिने ड्रग्ज खरेदी केल्याचे मान्य केले आणि ती जे काही करायची ते ते सुशांतसाठी होते, असे ती म्हणाली आहे. मात्र स्वतः कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे ती म्हणाली होती. पण मंगळवारी जेव्हा रियाला हेच प्रश्न विचारले गेले, तेव्हा तिने पहिल्यांदा ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. यापूर्वी तिने फक्त ड्रिंक आणि सिगारेट ओढत असल्याचे म्हटले होते.

  • ड्रग पॅडलरला 5 वेळा भेटल्याचेही मान्य केले

रियाने चौकशीदरम्यान कबूल केले की, ती तिचा भाऊ शोविक याच्यामार्फत पाच वेळा ड्रग पॅडलर अब्दुल बासित परिहारला भेटली होती. बासित तिच्या भावाला भेटायला घरी येत असे. सोमवारी रियाचा सामना सॅम्युअल मिरांडाशी करणअयात आला, तेव्हा त्याने सांगितले होते की, तो सुशांतसाठी बड्स आणत असे.

  • बॉलिवूड पार्ट्यांबद्दलही खुलासा केला

रिपोर्ट्सनुसार, रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील अशा काही पार्टीजबद्दल खुलासा केला जिथे ड्रग्जचा वापर सर्रास केला जातो. याच्या आधारे, 25 हिरो-हिरोईनचे डोजियर तयार केले गेले आहे. या सर्वांना एक-एक करुन समन्स पाठवले जाईल आणि चौकशीसाठी एनसीबी ऑफिसमध्ये बोलावले जाईल. मात्र, अद्याप कोणतेही नाव समोर आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *