प्रियांका चोप्राने ख्रिसमसनिमित्त घातलेल्या जॅकेटची किंमत ऐकून तुम्हाला भरेल हुडहुडी

ताज्या घडामोडी देशविदेश

लंडन : सध्या ख्रिसमसची धूम सुरु आहे. संपूर्ण जगभरात अजूनही ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु आहे. यामध्ये सामान्य नागरिकांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेच ख्रिसमस सेलिब्रेशन करत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील मागे नाही. आपल्या पतीसह ती ख्रिसमस साजरा करत आहे. याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनस सह लंडनमध्ये आहे. दोघेही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये असून या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राच्या जॅकेटची जास्त चर्चा होताना दिसून येत आहे.

प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोत निक आणि प्रियांकाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. तिने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियादेखील येत आहेत. परंतु यामध्ये प्रियांका चोप्राने घातलेल्या व्हाईट कोटने (White Coat) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत प्रियांका आणि निक जोनास दोघेही दिसून येत असून प्रियांका चोप्राने खास आपल्या स्टाईलमध्ये मेकअप, गॉगल आणि व्हाईट कोट घातला आहे. या कोटची किंमत इतकी आहे की सामान्य माणूस याच किमतीत एखादी दुचाकी खरेदी करू शकेल. या फोटोत प्रियांकाने ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर खास ख्रिसमस ट्रीचे डिझाईन असलेलं गॉगल घातला असून व्हाईट कोटमुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलत असून या फोटोत ती आणि निक खूपच सुंदर दिसत आहेत. निका जोनसने काळ्या रंगाचा कोट घातला असून त्याच रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. तिच्या या कोटची किंमत 712.50 डॉलर असून भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 52 हजार 600 रुपये असून Calina maxi कंपनीने हा कोट तयार केला आहे. हा कोट Mackage या कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असून तुम्ही देखील खरेदी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *