पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले आणि मग पत्नीने धू धू धुतले

0
247

औरंगाबाद : प्रेयसीसोबत मजामस्ती करणाऱ्या एका पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर दोघांनाही चांगलीच अद्दल घडवली आहे. आपल्या पतीसोबत प्रेयसीला पाहून पत्नी चांगलीच संतापली आणि मग तिने धावत जात प्रेयसीला आपल्याच स्टाईलमध्ये धडा शिकवला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद  झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ औरंगाबादमधील असल्याचं बोललं जात आहे. पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवली होती. पाळत ठेवून पत्नीने पतीचा पाठलाग केला त्यानंतर पती आणि पतीची मैत्रीण गाडीतून औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकालगतच्या एका हॉटेलमध्ये जाण्यासाठी थांबातच त्यांना रोखले.

यावेळी संतापलेल्या पत्नीने रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला पकडले आणि मग धू धू धुतले. पत्नी आल्याचे पाहून काहीक्षण पतीराजाला धक्काच बसला. पतीच्या मैत्रिणीला मारहाण करतानाचा औरंगाबादेतील हा व्हिडीओ साध्य सोशल मीडियावर चंगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, आपल्या पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने त्यांना चांगलाच धडा शिकवला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कुणीतरी शूट केल्याचं दिसत असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.