प्रेमसंबंध लपवण्यासाठी प्रियकराविरोधात बलात्काराची खोटी तक्रार

क्राईम मुंबई

उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड सुनावला

मुंबई : कुटुंबियांपासून प्रेमसंबंध लपवण्यासाठी प्रियकराविरोधातच बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या तरुणीला उच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. हे प्रकरण चालवण्याची इच्छा नसल्याचे सांगत, तक्रार रद्द करण्याची तरुणीची मागणी मान्य करत प्रियकराविरोधातील गुन्हा रद्द करत, दंडाची रक्कम चार आठवडय़ांत पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती रमेश धानुका व न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने या तरुणीला दिले.

पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर चार महिन्यांनी या तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. मार्चमध्ये तरुणीने प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.तक्रारदार तरुणी आणि तिच्या प्रियकरामध्ये शारीरिक संबंध होते. ते कुटुंबापासून विशेषत: मोठय़ा बहिणीपासून लपवण्यासाठी या तरूणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचा बनाव केला. तसेच प्रियकराविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली, असे तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.याच कारणास्वत आता तिला हे प्रकरण पुढे न्यायचे नाही. त्यामुळे ते रद्द करावी, अशी मागणी तिच्यावतीने न्यायालयाला करण्यात आली. पोलिसांतर्फे तरुणीच्या याचिकेला विरोध करण्यात आला. तसेच गुन्हा रद्द करण्यात आल्यास तिला दंड सुनावण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मान्य केले. तसेच कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन तक्रार केल्याचे तरुणीचे म्हणणे मान्य करण्यासही नकार दिला. त्याचवेळी तिची गुन्हा रद्द करण्याची मागणी मान्य करताना दंडाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *