ड्रग खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक केली आहे. प्रीतिका चौहानला ड्रग पेडलर फैझल याच्याकडून ड्रग्ज घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी (25 ऑक्टोबर) ही माहिती दिली. या दोघांनाही 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रीतिकाने जामीनासाठी अर्ज केला असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. तसंच एनसीबीला दिलेला जबाब तिने फिरवला आहे.

अंमली पदार्थांच्या सौद्याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनसीबी-मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री वर्सोव्यातून दोघांना पकडलं. त्यांच्याकडून 99 ग्राम ‘मारिजुआना’ जप्त करण्यात आलं. या दोघांनी कथितरित्या वर्सोव्यात राहणाऱ्या दीपक राठोडकडून हे ड्रग घेतल्याची कबुली दिली. एनसीबीने अटक केलेल्या दोघांना कोर्टात हजर असता त्यांना 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान एनसीबीचे अधिकारी साध्या कपड्यांमध्ये मुंबईच्या वर्सोवामधील दोन ठिकाणी देले होते. एनसीबीच्या पथकाने पाच जणांना अटक केली असून ऑपरेशन अजून सुरु आहे

मूळची हिमाचल प्रदेशची असलेली 30 वर्षीय प्रीतिका चौहान ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. मागील पाच वर्षात तिने सीआयडी, सावधान इंडिया, संकटमोचन महाबली हनुमान आणि देवों के देव महादेव यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *