अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड यांच्यातला वाद पोहोचला उदयनराजे यांच्या दरबारात

ताज्या घडामोडी सातारा

सातारा : ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेतील वाद आणखी चिघळला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्येआणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडयांच्यातल्या वाद आता साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे उदयनराजे भोसले यांच्या दरबारात पोहोचला आहे.’माझी आई काळुबाई’ या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

खासदार उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे.

अलका कुबल यांनी प्राजक्ता गायवाडची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.

पत्रकार परिषेत काय म्हणली प्राजक्ता?

माझी आई काळुबाई या मालिकेला रामराम ठोकल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. प्राजक्ता म्हणाली, ‘मला या मालिकेतून काढलं अशी खोटी बातमी पसरवली जात आहे. मी स्वत: या मालिकेमधून बाहेर पडले आहे. मला सेटवर विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली. माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले. तुमच्या मुलींसोबत असं काही घडलं असतं तर अलका ताई अशाच वागल्या असत्या का ?” असा सवालही तिने उपस्थित केला आहे. प्राजक्ता पुढे म्हणाली, “माझ्यामुळे सीरिअलचं शूटिंग कधीही थांबलं नव्हतं. मी इव्हेंटची सुपारी घेते असा आरोप झाला त्यात तथ्य नाही. कोरोनामुळे इव्हेंट बंद आहेत.” असं प्राजक्ताने स्पष्ट केलं. पुढे ती म्हणाली, “मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता.” पुढे प्राजक्ताने एक धक्कादायक आरोप केला आहे. “मला रक्त लागलेली साडी दिली गेली, माझ्या आईने त्याविषयी विचारले तर त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटलं गेलं.”

प्राजक्ताने पैशांबद्दलही काही गौप्यस्फोट केले आहेत. मला या मालिकेचं आतापर्यंत एकही दिवसाचं पेमेंट झालेलं नाही, “मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8- 8 / 10-10 तास करतात तेव्हा आमच्या घरात चूल पेटते. असं असताना मला एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केलं जात आहे.” राजकारणात जाणार का असा सवाल विचारल्यानंतर सध्या तसा कोणताही विचार केला नसल्याचं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *