गोव्यात हनिमूनदरम्यान घडला हा प्रकार, पूनम पांडेच्या पतीला पोलिसांनी केली अटक

Uncategorized ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच आपल्या बोल्ड छायाचित्र आणि व्हिडीओसाठी चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळे चर्चिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या बॉर्यफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) सोबत लग्नबंधनात अडकली आहे. हनिमूनला जाण्यापूर्वीचे फोटो तिने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते.

लग्नाच्या 21 दिवसांनंतर एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. पूनम पांडेने पतीवर माहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. इतकचं नाही तर हे प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की पोलिसांनी तिचा पती  (Poonam Pandey Husband Arrested) सॅम बाँम्बे याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला मंगळवारी गोव्यात अटक करण्यात आली. अभिनेत्रीने पतीविरोधात छेडथाड, जीवे मारण्याची धमकी व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *