शहरातील विश्व मिलन लॉज वर पोलिसांची धाडसहा पीडितांची सुटका, चार जणांवर गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) : शहरातील पांजरापोळ चौकात असणाऱ्या विश्व मिलन लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड टाकली याठिकाणी बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू होता पोलिसांनी सहा पीडितांची सुटका केली तर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.           सुरज अवसेकर,राहूल मल्हारी सोनकांबळे, मल्लिनाथ विभुते व सोपान पांडुरंग लांंबतुरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या विश्व मिलन लॉजमध्ये बेकादेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानंतर गुरुवारी दुपारी लॉजवर धाड टाकली. त्यावेळी लॉजवर असणाऱ्या सहा पिडीतांकडून आरोपी वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पुढे आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे,पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर, पोलीस हवालदार बंडगर,पोलीस नाईक बंडगर, पोलीस हवालदार काळे, इनामदार मुजावर मोरे मंडलिक व भुजबळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *