सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
71
शहर पोलीस दलात पसरली शोककळा
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ सुहास भोसले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास निधन झाले असून,त्यांच्या निधनानं शहर पोलीस दलात शोककळा पसरलीय.मूळचे टेंभुर्णी येथे राहणारे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले हे यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सोलापूर शहरात रुजू झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या कामाचा दरारा अनेकांनी पाहिला असून गेल्याच वर्षी त्यांनी सोलापूर शहर आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ चा पदभार स्वीकारला होता.त्यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी एमआयडीसी,जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील मालमत्ते विषयीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले होते.मंगळवारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला होता. बुधवारी सकाळी ते व्यायामासाठी गेले असता, अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले.त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले होते.मात्र त्यांचं उपचारापूर्वीच निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.१० ऑगस्ट रोजी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून,सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या या दुःखद बातमीने पोलीस दलात हळहळ व्यक्त होतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here