police-news-solapur

खाकी वर्दीतील हिडीस गुंडगिरीने जनता त्रस्त

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

खाकी वर्दीतील हिडीस गुंडगिरीने जनता त्रस्त..!

police news solapur

सोलापूर (प्रतिनिधी): खल: रक्षणाय खल: निग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन कर्तव्य बजावणारे पोलीस हे  जनतेच्या रक्षणार्थ.. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत ही खुप कौतुकास्पद बाब असली तरी पोलिसांकडून सध्या नागरिकांना खूप अपमानास्पद आणि गुंडगिरीची वागणूक मिळत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

जनतेला नियम शिकवणारे पोलीस जेव्हा स्वतःच नियमांचे उल्लंघन करतात तेव्हा पोलिसांसाठी कायदे आणि नियम नाहीत का असा सवाल जनतेतून उपस्थित केला जातो.

समाजामध्ये जनतेच्या अनेकांच्या अनंत अडचणी असतात आणि त्या समजून घेऊन त्यातून कायदेशीर अथवा रीतसर मार्ग काढून जनतेला सहकार्य करणे हे खरं तर पोलिसांचे कर्तव्य असतं.

कर्तव्य बजावताना त्यांच्याकडून खूप दुजाभाव होत असल्याचंही बऱ्याच वेळा दिसून आलेला आहे. मागच्या वेळेस सुद्धा हेल्मेट सक्ती केल्यानंतर काही मोजक्या हेल्मेट परिधान न केलेल्या व्यक्तीनां दंड करायचा आणि इतरांना सर्वांना सोडून द्यायचं असा मनमानी आणि मस्तवाल कारभार पोलिसांचा सुरू होता त्याबद्दल अनेक नागरिकांनी प्रसारमाध्यमांकडे तक्रारही केली होती.

ज्यांचा उदरनिर्वाह भाजीविक्रीवर अवलंबून आहे अशा भाजी विक्रेत्यांना भाजी विकू न देणे.. त्यांना त्रास देणे जातीवाचक शिवीगाळ करणे अशा अनेक प्रकारे सध्या पोलीस नागरिकांना त्रास देत आहेत.

खरंतर पोलीस आयुक्तांनी हे पोलीस प्रशासनामध्ये खरतरं पोलीस आयुक्तांनी हे पोलीस प्रशासनामध्ये चालले तरी काय याचा आढावा घेणे सध्या खूप गरजेचे आहे.

आपल्यानां सोडून द्यायचं आणि इतरांना दंडाची सक्ती करायची.. पोलिसी खाक्या दाखवायचा.. गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवायची.. अनेकांना सोडून द्यायचं आणि काही मोजक्या लोकांना वेठीस धरायचं.. सक्तीने दंड वसूल करायचा.. अशी अनेक बेकायदेशीर कृत्ये पोलिसांकडून आधीही होत होती आणि सध्याही  होताना दिसते.

सध्या ज्येष्ठांना सुद्धा वेठीस धरण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांना किंवा वयोवृद्धांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो या अफवेमध्ये कितपत सत्य आहे माहिती नाही त्याबद्दल प्रशासन काही भूमिकाही स्पष्ट करत नाही परंतु वयोवृद्धांना कोरोनाच्या नावाखाली येनकेन प्रकारे त्रास दिले जात असून वृद्धांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून अगदी ठणठणीत असतानासुद्धा होमकवारंटाईन  अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात असल्याच्या अनेक तक्रारी सध्या नागरिक करत आहेत.

वयोवृद्ध व्यक्तीने बाहेर फिरायचं नाही आणि गरोदर मातांनी घराबाहेर पडायचं नाही अशा जाचक अटी सध्या लादून जनतेवर अन्याय करण्याचे काम सध्या पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.कोणत्याही दुकानांमध्ये जर वयोवृद्ध दिसले तर ते दुकान दहा ते पंधरा दिवसासाठी सील करण्यात येईल अशा अनेक निरर्थक अटी सध्या वयोवृद्धांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या असून हे अत्यंत चुकीचं असल्याचं नागरिकांतून बोललं जात आहे.

पोलीसच जेव्हा डबल ट्रिपल सीट फिरतात.. पोलिसांच्या गाडीत जेव्हा बिर्याणी आणि दारूच्या बाटल्या अशी मादक द्रव्य आढळतात तेव्हा खरेच पोलीस स्वतःचे कर्तव्य बजावत आहेत की नियमांचे कायद्याचे उल्लंघन करत आहेत की त्यांच्यासाठी कायदे आणि नियम नाहीत असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातो.

आपल्या देशामध्ये कायदा सर्वांसाठी समान आहेत.. नियम सर्वांसाठी सारखे आहेत तेव्हा पोलिसही काही लाडके नाहीत त्यामुळे त्यांनी जर नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही व्हायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *