पोलीस नाईक होवाळला न्यायालयीन कोठडी ,पाच हजार रुपये लाचेची मागणी प्रकरण

सोलापूर

मोहोळ : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या मुलांना अटक न करता तपासात सहकार्य करण्याच्या कारणावरून पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस नाईक सयाजीराव होवाळ यांना सत्र न्यायाधीश व्ही. जी मोहिते यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
तक्रार बाबत मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार त्यांच्या मुलांना अटक न करण्यासाठी व पुढील तपासात सहकार्य करण्यासाठी पोलीस नाईक होवाळ यांनी त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलीस नाईक होवाळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करून जिल्हा व सत्र न्यायाधीश  व्ही. जी मोहिते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासाकरिता आरोपीची तीन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. गुन्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आलेली असून या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी होवाळ यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या खटल्यात आरोपीतर्फे अँड. मयूर खरात, ॲड. सुमित भंडारे तर सरकार तर्फे ॲड. काझी यांनी काम पाहिले.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *