लग्नाच्या वाढदिवशीच महिला PSI ची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या

ताज्या घडामोडी देशविदेश

गुजरात : एका महिला पीएसआयने स्वत:ला सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनेच पोटात गोळी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला पीएसआयने आत्यहत्येपूर्वी सुसाइड नोटही लिहिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. उच्च पोलीस अधिकाऱ्यांसह, स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचून पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक कलह या आत्महत्येचं कारण असल्याचं समोर येत आहे. आत्महत्या केलेल्या महिला पीएसआयने सुसाइड नोटमध्ये यासाठी कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे.

शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवार दुपारच्या दरम्यान महिलेने राहत्या घरात आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने पोटात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना गुजरातमधील आहे. पोलिसांची पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पीएसआय अनिता जोशी या पती, पाच वर्षाचा मुलगा आणि सासूसोबत राहत होत्या. पीएसआय अनिता जोशी यांचा पती सचिनही पोलिसांत आहे.

त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक डायरी आढळून आली. त्यात जगणं कठिण असून मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं लिहिलं आहे. पीएसआय अनिता या मुळच्या अमरेलीतील तर त्यांचं सासर भावनगरमध्ये होतं. 2013 मध्ये त्या परीक्षा पास झाल्या आणि कॉन्स्टेबलवरून पीएसआय झाल्या. त्यांची अमरेली ते सूरत कंट्रोल रूममध्ये पोस्टिंग झाली होती.

अनिता जोशी यांचे पती, मुलगा आणि सासू गावी लग्नसमारंभासाठी गेले होते. या दरम्यान, पती फोनवरून त्यांना संपर्क करत होते. परंतु काहीच संपर्क होत नव्हता, म्हणून त्यांनी पोलिसांत कळवलं. त्यानंतर पीसीआर व्हॅनसह पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी दाखल झाले. दरवाजा आतून बंद होता, तसंच आतून कोणताही आवाज, हालचाली होत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला आणि आत अनिता यांचा मृतदेह आढळला.

पीएसआय अनिता जोशी यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु त्यांचे पतीसोबत काही कारणास्तव वाद-विवाद असल्याची माहिती आहे. ज्यादिवशी त्यांनी आत्महत्या केली, त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. पीआय धुलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी कोणालाही गोळीचा आवाजही ऐकू आला नाही. या घटनेनंतर, अनिता यांच्या पतीचे मोलकरणीसोबत अफेयर असल्याने, दोघांमध्ये अनेकदा भांडण झाल्याची माहितीही समोर येत आहे. परंतु सध्या या अँगलने तपास सुरू झाला नसून, सध्या याप्रकरणी शेजारी आणि कुटुंबियांकडे अधिक चौकशी केली जाणार असल्याचं पीआय धुलिया यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *