तरुण पोलीस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

क्राईम पंढरपूर


पो.उ.नि. राजेंद्र क्षीरसागर यांनी गमावले प्राण
पंढरपूर (प्रतिनिधी):
– पंढरपूर शहर पोलीस ठाणे मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र क्षिरसागर यांचा बुधवारी पहाटे  पंढरपूर नजीक कोर्टी गावाजवळ सेंट्रा वाहन पलटी झाल्याने अपघाती मृत्यू झाला आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की महुद कडून पंढरपूर कडे येताना क्षिरसागर हे आपले खाजगी वाहन सेंट्रो कार मधून येत होते.सदर कार कोर्टी गावानजीक आली असताना त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली ते वाहनाखाली दबले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अपघाताने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.         पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शिरसागर हे मूळचे लातूर येथील असून यापूर्वी त्यांनी सोलापूर कंट्रोल येथे कार्यरत होते.सात महिन्यापूर्वी ते पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला रुजू झाले होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली होती. मागील काही दिवसापासून ते रजेवर होते.मात्र काल पहाटेच्या सुमारास पंढरपूरच्या नजीकच कोर्टी गावाजवळ सेंट्रो वाहन पलटी झाल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार होता.त्यांच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *