पोलीस आयुक्तालयाचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस – पोलीस आयुक्त : शिंदे

सोलापूर


रोहन नंदाने / सोलापूर 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सोलापूर पोलीस आयुक्तालयाचा २८ वा वर्धापन दिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा मानस आहे.पोलीस आयुक्तालयाकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा समजून घेण्याच्या उद्देशाने यंदा साध्या पद्धतीने पोलीस आयुक्तालयआला विद्युत रोषणाई करून येत्या आठवड्यात ऑनलाईन चर्चासत्र ठेवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दैनिक “जनसत्य” बोलताना दिली. 

      सोलापूर पोलीस आयुक्तालयाची स्थापना  १९९२ रोजी झाली.त्याचा सोमवारी,दि.१० ऑगस्ट रोजी २८ वा वर्धापनदिवस येत आहे.गतवर्षापर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापनदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.       त्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या वास्तूत आणि पोलीस आयुक्तालयाच्या भव्य वास्तूवर नयनरम्य,मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात करण्यात आली होती.पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या प्रारंभीच्या ५ आणि आताच्या ७ पोलीस ठाण्याच्या इमारती आणि पोलीस चौक्यांच्या इमारतींवर लाईटींग,पोलीसांकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा समजून घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते.      त्याचबरोबर बदलल्या काळाबरोबर बदलत असलेल्या पोलिसींगचे स्वरूप देशाचा उद्याचा आधारस्तंभ म्हणून पाहिल्या जात असलेल्या विद्यार्थी आणि युवा पिढीसमोर ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनाचं विशेष आकर्षण म्हणून पाहिले गेलेले ‘शस्त्र प्रदर्शन’ कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने यंदा आयोजित केले जाणार नाही, कारण यावेळी शाळा-महाविद्यालये बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शेवटी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *