मोहोळचा सहाय्यक फौजदार पितांबर शिंदे निलंबित, पोलीस अधीक्षकांची कारवाई

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

वाळूच्या गुन्ह्यातील आरोपीला सोडून दिल्यामुळे झाले निलंबन
व्हिडिओमध्ये सर्व प्रकार कैद; ग्रामीण पोलिस दलात खळबळ
सोलापूर (प्रतिनिधी) मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे करण्यात आलेल्या कारवाईतील वाळूच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस ठाण्यातून सोडून दिल्या प्रकरणी व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सहाय्यक फौजदार शिंदे याना निलंबित करण्यात आले आहे. याचे फोटो काढण्यात आले असून त्याचा व्हिडिओ हाती लागल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकारामुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.सहाय्यक फौजदार पितांबर मारुती शिंदे (नेमणूक मोहोळ पोलीस ठाणे) असे निलंबित करण्यात आलेल्याचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आष्टे वाळू उपसा करणार्‍या लोकांवर कारवाई केली होती.यामध्ये १२ आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.कारवाईच्यावेळी मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक फौजदार पितांबर शिंदे उपस्थित होते.याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या १२ जणांना मोहोळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.सहाय्यक फौजदार पितांबर शिंदे यांनी अटक करण्यात आलेल्या अच्युत बब्रुवान गायकवाड व अन्य आरोपींशी फक्त चर्चा करून सोडून दिले.हा सर्व प्रकार फोटो व व्हिडीओमध्ये कैद झाला होता.हा प्रकार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या लक्षात आला.याची गंभीर दखल घेऊन त्यांनी सहाय्यक फौजदार पितांबर शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

……………गायकवाडवर जुगार,वाळूचे अनेक गुन्हे 

फोटोमधील आरोपी अच्युत बब्रुवान गायकवाड, (रा.गायकवाड वस्ती,मोहोळ) यांचे विरूध्द मोहोळ पोलीस ठाणेस एकुण १२ गुन्हे दाखल असून ते सन २००५ ते २०२१ या कालावधीत असून हे गुन्हे जुगार व वाळूच्या संदर्भात असल्याने तो क्रियाशील गुन्हेगार असल्याचे दिसुन येते.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
 ………..अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होईल

निलंवन काळात हजेरी देण्यासाठी पितांबर शिंदे यांची नेमणूक पोलीस मुख्यालय,सोलापूर ग्रामीण येथे करण्यात आली असून दिवसातून दोन वेळा हजेरी देण्याचे पोलीस मुख्यालय,सोलापूर ग्रामीण येथे बंधनकारक आहे.तसेच शिंदे यांना पूर्व परबाणगीशिवाय कुठेही सोडता येणार नाही.जर तुम्ही नेमणूकीच्या ठिकाणी हजेरी दिली नाही तर तुम्ही नेमणूकीचे ठिकाण अनधिकृतपणे सोडले असे गृहीत धरून तुमचेविरूध्द शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे पत्रकात म्हटले आहे.\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *